Associate Sponsors
SBI

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Shiv Sena minister reacts to the NCP's failure in Delhi elections, questioning the possibility of their success so soon.
“राष्ट्रवादी एवढ्या लवकर यशस्वी होईल हे स्वप्न पाहणेही…”, दिल्लीच्या निकालानंतर शिवसेनेच्या मंत्र्याचे मोठे विधान

Shiv Sena On NCP : महाराष्ट्रात महायुतीचा (एनडीए) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही (अजित पवार) दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवली…

malang gad festival
मलंग गडाच्या उत्सवासाठी दोन्ही शिवसेनेची मोर्चेबांधणी; दोन्ही गटांकडून भाविकांना आवाहन, दोघांकडून तयारी

दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच याबाबत बैठका घेत भाविकांना आणि समर्थकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Eknath Shinde visiting Nashik faction Shiv Sena
एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्यावरून शिवसेनेत गटबाजी

या दौऱ्याची पूर्वतयारी आणि नियोजनाची वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्रपणे तयारी चालविल्याने नाशिकमधील शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत.

ten former corporators Sambhajinagar joined Shiv Sena Eknath shinde
ठाकरे गटाची गळती थांबता थांबेना, संभाजीनगरमधील १० माजी नगरसेवक शिंदेसेनेमध्ये

महापालिकेचे माजी सभापती मोघन मेघावाले, माजी सभागृह नेता किशोर नागरे, गटनेते मकरंद कुलकर्णी, अनिल जयस्वाल, रुपचंद व्यवहारे, स्वाती नागरे, ज्योती…

guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी

पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय प्रलंबित असपुतांनाच भाजपने रायगड जिल्ह्यासाठी संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलार यांची नियुक्ती केली आहे.

Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ भूमिकेवर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “उद्योजकांबाबत घेतलेली भूमिका…”

Mumbai Pune News LIVE Updates, 7 February 2025 : आजच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर.

मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे? प्रीमियम स्टोरी

Eknath Shinde vs BJP: पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

parbhani shiv sena ubt district Chief Vishal Kadam is joining eknath shindes shiv sena
मुहूर्त ठरला ! उबाठा शिवसेनेच्या परभणी जिल्हाप्रमुखांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गुरुवारी प्रवेश

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून गुरुवारी (दि.6) एकनाथ शिंदे…

Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पालकमंत्रीपदांचा नक्की गोंधळ काय? फडणवीसांनी सांगितली सत्यस्थिती

Devendra Fadnavis : पालकमंत्री पदाच्या नियुक्तीनंतर रायगड आणि नाशिकच्या निर्णयांवरून महायुतीमध्ये काहीशी नाराजी पाहायला मिळाली होती. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी…

CM Devendra Fadnavis On Varsha Bungalow
Devendra Fadnavis : वर्षा पाडणार? काय वेड्यांचा बाजार आहे?… फडणवीसांनी टाकला सगळ्या चर्चांवर पडदा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्याच्या संदर्भात सुरु असलेल्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या