शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Eknath Shinde
चार मंत्री असलेल्या साताऱ्यात पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणाची वर्णी लागणार? शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका स्पष्ट, म्हणाले…

Shambhuraj Desai : शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्ह्याच्या पाकलमंत्रिपदावर भाष्य केलं.

Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली

Shambhuraj Desai : संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे.

Cabinet Portfolio
Cabinet Portfolio : नितेश राणे, नरहरी झिरवाळ ते भरत गोगावले; महायुतीतल्या चर्चेतल्या ‘या’ पाच मंत्र्यांना कुठली खाती मिळाली?

चर्चेतल्या पाच मंत्र्यांना नेमकी कुठली खाती मिळाली आहेत? जाणून घ्या कसं आहे महायुतीचं खातेवाटप?

eknath shinde Vidarbha
पश्चिम वर्‍हाडात पडझडीमुळे शिवसेनेमध्ये खदखद, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची दरी; स्वपक्षीय नेत्यांनाच विरोध

महायुतीमध्ये अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभेच्या पाच जागा लढवल्या. त्यापैकी चार जागांवर शिवसेना शिंदे गटाला दारूण पराभवाचा सामना…

Sharad Sonawane Image.
Sharad Sonawane : “…तर किंमत थोडी वाढली असती, माझा पालापाचोळा झाला”, अपक्ष आमदाराचे वक्तव्य अन् सभागृह खळखळून हसलं

Sharad Sonawane : पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभेत बोलायला संधी मिळाल्यानंतर जोरदार टोलेबाजी केली.

Devendra Fadnavis On Kalyan Ajmera Society Dispute
Kalyan Society Scuffle : मराठी माणसाला कल्याणमध्ये मारहाण, मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; म्हणाले, “कधी-कधी काही नमूने…”

कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली आहे.

Image Of Chhagan Bhujbal And MLA Suhas Kande.
Chhagan Bhujbal : “भुजबळांचं जेव्हा वाईट होतं तेव्हा मी खुश असतो”, एकनाथ शिंदेंचे आमदार अजित पवारांच्या भेटीनंतर काय बोलून गेले

Suhas Kande On Chhagan Bhujbal : सुहास कांदे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुहास कांदे…

sanjay shirsat
Maharashtra Cabinet Portfolio Distribution : महायुतीच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप आजच होणार? विधान परिषदेत शिवसेनेच्या नेत्याचं सूचक वक्तव्य

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी मंत्रिमडळाच्या खातेवाटपाबद्दल मोठं विधान केलं आहे.

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बाहेर पडणार का? शिवसेनेची का सोडली होती साथ? (फोटो सौजन्य @ANI)
Maharashtra Politics : छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही बाहेर पडणार का? शिवसेनेची का सोडली होती साथ? प्रीमियम स्टोरी

Chhagan Bhujbal NCP News : डिसेंबर १९९१ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली होती, आता ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी…

Prithviraj Chavan comment on Amit Shah, Amit Shah ,
Maharashtra Assembly Winter Session Updates : अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा

Maharashtra Assembly Winter Session Updates, Day 4 : सध्या नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन सध्या विविध मुद्द्यांनी…

Eknath Shinde
Eknath Shinde On RSS : “संघाच्या शाखेतूनच माझी सुरूवात…”; आरएसएस मुख्यालयात पोहचताच एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरएसएस मुख्यलयातून प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Shirsat on Sharad Pawar
Sharad Pawar : “जेव्हा ते शांत असतात तेव्हा समजून जायचं की…”; शरद पवारांबद्दल शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा

शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे.

संबंधित बातम्या