scorecardresearch

शिवसेना News

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Low response to Shiv Sena membership drive in Jalgaon
जळगावमध्ये शिवसेनेच्या शिंदे गट सदस्य नोंदणीला थंड प्रतिसाद…गुलाबराव पाटील यांचा पदाधिकाऱ्यांवर रोष

तीन महिन्यात जेमतेम ४० टक्केच नोंदणी झाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सदस्य नोंदणीत कमी पडलेल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत.

Uddhav Thackeray latest news in marathi
गळती रोखण्याचे ठाकरे गटासमोर आव्हान; माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्या निर्णयाकडे लक्ष

०१७ च्या निवडणुकीत १० नगरसेवक निवडून आल्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला ठरला होता. मात्र आता दहिसर, मागाठाणेत ठाकरे यांच्या शिवसेनेला…

Set aside differences in local body elections appeal by Shiv Sena leader Anandrao Adsul
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत मतभेद बाजूला ठेवा – शिवसेना नेते आनंदराव आडसूळ यांचे आवाहन

शिवसैनिक पक्षासाठी सातत्याने राबत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतभेद बाजूला ठेवून पक्ष संधी देईल, त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे रहा,…

shiv sena held workshop eknath shinde urged office bearers of wining before municipal election
आता भगवा फडकूनच थांबायाच : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना शहर आणि जिल्हा पदाधिकारी क्षमता बांधणी कार्यशाळेचे शिवसेना नेत्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आयोजन करण्यात केले होते.एकनाथ शिंदे यांनी…

Yavatmal Guardian Minister Sanjay Rathod asserted that India should take over Pakistan occupied Kashmir
शिवसेनेच्या मंत्र्यांचे धाडशी विधान; म्हणाले “पाकव्याप्त काश्मीर भारताने परत घ्यावे”

भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून, शत्रुंच्या नापाक कारवायांना नेस्तनाबूत करत भारताने पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यावे,

kolhapur rajesh Kshirsagar Mahayuti capable of winning Municipal Corporation
कोल्हापूर महानगरपालिका जिंकण्यास महायुती सक्षम – राजेश क्षीरसागर

गेल्या तीन वर्षांच्या काळात महायुती शासनाने कोल्हापूरची विकासाचे चांगले निर्णय घेतल्याने मतदार महायुतीच्या बाजूने उभे राहतील. कार्यकर्त्यांनी कामाला लागून महानगरपालिका…

Harshad Prakash Karkar left uddhav thackeray shiv sena and joined Shiv Sena Shinde
दहिसरमधील माजी नगरसेवक हर्षद कारकर यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

मुंबई महानगरपालिका विधी समितीचे माजी अध्यक्ष आणि २०१७ ते २०२२ या कालावधीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर यांनी उद्धव…

In Mira Bhayandar, after Shiv Sena, now BJP has set up a container office. The Shiv Sena-BJP conflict is intensifying
मिरा भाईंदरमध्ये शिवसेना पाठोपाठ आता भाजपचे कंटेनर कार्यालय? शिवसेना – भाजप वाद शिघेला

येत्या १२ मे रोजी आयुक्तांच्या निवासस्थानासमोरच हे कंटेनर कार्यालय उभारले जाणार असून, याबाबतची निमंत्रण पत्रिका प्रसिद्ध करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात…

ex late mla Sanjay Band wife preeti band join shiv sena in Amravati
उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेच्या माजी आमदाराची पत्नी शिंदे गटात फ्रीमियम स्टोरी

पराभवानंतर एकनाथ शिंदेंनी आपुलकीने विचारपूस केली, म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली.