शिवसेना Videos

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबईमध्ये (Mumbai) मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.


शिवसेनेने १९८९ साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे नंतर लोकसभा अध्यक्ष झाले होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.


२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याबरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री झाले. मात्र २०२२ मध्ये शिवसेनेमध्ये फुट पडली. शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. पक्षातील बहुसंख्य आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत राज्यात सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.

बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नाव बदलले आणि पक्षाचे चिन्हदेखील बदलले. पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाले.

असली नकली शिवसेनेवरून दोन्ही गटांमध्ये जोरदार खटके उडाले. निवडणुकीत बघून घेण्याची भाषा झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही गटांची ताकद स्पष्ट झाली. महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत राज्यात दणदणीत विजय मिळवला. महायुतीला १७ जागांवरच विजय मिळवता आला. या निवडणुकीत एकनाथ शिंदे गटाला महायुतीत १५ जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी त्यांना ७ जागा जिंकण्यात यश आले. तर, उद्धव ठाकरे गटाला मिळालेल्या २१ जागांपैकी ९ जागांवर विजय मिळाला. निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा ठाकरे गटापेक्षा अधिक होता. मात्र निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मिळालेली एकूण मते ही शिंदे गटापेक्षा अधिक आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने गड राखला तर शिंदे गटाने ठाणे, कल्यणामध्ये आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.


मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, कांदा प्रश्न, पिकांना हमीभाव यासह विविध कारणांमुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारला लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याचे बोलले जाते.


Read More
Maharashtra assembly election 2024 exit polls analysis by girish kuber
शेतकऱ्यांचे प्रश्न, वाढलेलं मतदान, ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा; कोणते मुद्दे ठरणार निर्णायक?

शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक…

A non bailable case has been registered against Kedar Dighe informed by police
Kedar Dighe: केदार दिघेंवर अदखलपात्र गुन्हा दाखल; पोलिसांनी दिली माहिती

महाविकास आघाडीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे कोपरी-पांचपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांविरोधात कोपरी पोलीस ठाण्यात आचारसंहितेचे उल्लंघन करीत दारू आणि…

Suhas Kande gave information about the incident happen in Nandgaon
Suhas Kande: “समीर भुजबळ आणि त्यांचे गुंड…”; नांदगावमधील घटनेबाबत सुहास कांदेंनी सांगितलं

नांदगाव मतदारसंघात आज (बुधवार) सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली.नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. या…

Chief Minister Eknath Shindes press conference Live from Balasaheb bhavan Mumbai
Eknath Shinde Live: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पत्रकार परिषद Live

मुंबईतील बाळासाहेब भवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे विविध विषयांवर…

Maharashtra vidhansabha election i dont think the upcoming elections will be fair said shivsenas sushma andhare
Sushma Andhare on Uddhav Thackeray: जर आमच्या बॅगा तपासत असाल…; सुषमा अंधारेंचा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज प्रचार सभेसाठी वणीला गेले असता निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची बॅगेची तपासणी…

Shivsena leader sada sarvankar clarified about mahayuti support to amit thackeray in mahim constituency
Sada Sarvnkar on Candidature: अमित ठाकरेंना मदत व्हावी, ही महायुतीची भूमिका? प्रीमियम स्टोरी

शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या उमेदवारीवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. कारण याच मतदारसंघातून मनसेचे अमित ठाकरेही…

exclusive interview with CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : ठाकरेंशी फारकत ते महायुतीचं सरकार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्फोटक मुलाखत

लाडकी बहीण योजनेचा निधी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, शिवसेनेतील बंडखोरी हे मुद्दे सध्या निवडणुकीच्या निमित्ताने बरेच चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर…

MP sanjay raut serious allegation on minister dada bhuse
Sanjay Raut on Advay hire: पाच शिवसैनिक जखमी, संजय राऊतांचा आरोप

शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) मालेगाव बाह्य मतदार संघातील उमेदवार अद्वय हिरे यांच्यावर सोमवारी दुपारी शहराजवळील सोयगाव भागात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार…

Mahayuti will support MNS for vidhansabha election 2024 in Mahim
Mahayuti and MNS: माहीममध्ये महायुती मनसेला सहकार्य करणार?

माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी देखील उमेदवारी…

Second list of 15 candidates of Shiv Sena Thackeray group announced
Uddhav Thackeray shivsena: शिवसेना ठाकरे गटाची १५ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; कुणाकुणाला संधी?

आज (२६ ऑक्टोबर) शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर…

ताज्या बातम्या