Associate Sponsors
SBI

श्रेयस अय्यर News

श्रेयस अय्यर हा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याचा जन्म ६ डिसेंबर १९९९ रोजी मुंबईतील चेंबूर येथे झाला. त्याचे शिक्षण माटुंगा येथील डॉन बॉस्को हायस्कूल झाले आहे. तसेच तो रामनारायण पोद्दार महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. लहानपणापासून त्याने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली. शिवाजी पार्क जिमखाना येथे तो प्रशिक्षण घेत होता. याच सुमारास श्रेयसमधील कौशल्य प्रशिक्षक प्रवीण आम्रे यांनी हेरले. कॉलेजमध्ये असताना त्याने अनेक महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये भाग घेत आपली क्षमता दाखवून दिली.


२०१४ मध्ये त्याला यूकेच्या ट्रेंट ब्रिज क्रिकेट संघाकडून खेळायची संधी मिळाली. या दौऱ्याच्या ३ सामन्यांमध्ये त्याने ९९ च्या सरासरीने २९७ धावा केल्या. त्यातल्या एका सामन्यामध्ये त्याने १७१ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच वर्षी श्रेयरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये झळकला. पुढे २०१४-१५ च्या रणजी स्पर्धेमध्ये मुंबई संघामध्ये त्याची निवड करण्यात आली. तेव्हा दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने चांगला खेळ करुन दाखवला. तो आजही मुंबई संघाकडून राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळत आहे. पुढे २०१८-१९ मध्ये देवधर ट्रॉफीसाठीही त्याला निवडण्यात आले. स्पर्धेतील तीन सामन्यांमध्ये त्याने १९९ धावा केल्या होत्या. तेव्हा तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला होता.


रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी अशा स्पर्धांमधील चांगला खेळ पाहून श्रेयसला आयपीएलमध्ये सहभागी करण्यात आले. २०१५ मध्ये आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याच्यावर २.६ कोटी रुपयांची बोली लावली. २०१५ ते २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीत दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे २०१८ मध्ये दिल्लीच्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयसला देण्यात आली. २०२१ पर्यंत तो दिल्लीच्या संघात होता. आयपीएल २०२१ सुरु असताना दुखापतींमुळे त्याला उपचार घेण्यासाठी जावे लागले. २०२२ च्या आयपीएल लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने १२.२५ कोटी बोली लावत त्याला संघात सामील केले.


२०१७ मध्ये श्रेयर अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. नोव्हेंबर २०१७ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये त्याला समाविष्ट करण्यात आले होते. पुढे डिसेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यामध्ये त्याला खेळायची संधी देण्यात आली. २०२१ मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. श्रेयसने आंतरराष्ट्रीय स्तरावर ३२ कसोटी सामन्यांमध्ये ६२४ धावा; ४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये १,५९३ धावा; ६० टी-२० सामन्यांध्ये १,०४३ धावा केल्या आहेत. भारतीय संघातील युवा फळीमध्ये त्याचा समावेश होतो. भविष्यात श्रेयस आणखी चांगला खेळ दाखवेल अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे. लवकरच सुरु होणाऱ्या आशिया कप २०२३ साठीच्या भारतीय संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे. तो मध्यम फळीत चौथ्या क्रमांकावर खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये तो भारताकडून खेळू शकतो असेही म्हटले जात आहे.


Read More
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप

Shreyas Iyer Controversy : मुंबई आणि जम्मू-काश्मीर यांच्यात सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जोरदार नाट्य पाहायला मिळाले. सामन्यादरम्यान…

Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे

Ranji Trophy Elite Matches 2025 : टीम इंडियाच्या बड्या खेळाडूंची खराब कामगिरी रणजी ट्रॉफीमध्ये सुरूच आहे. दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा,…

Rohit Sharma Dance Step on Wankhede Stadium Stage to Call Shreyas Iyer to Join Him Video Goes Viral
Rohit Sharma Video: रोहित शर्माचा ब्रेकडान्स, श्रेयस अय्यरला स्टेजवर बोलवण्यासाठी केली हटके डान्स स्टेप, वानखेडेच्या कार्यक्रमातील VIDEO व्हायरल

Rohit Sharma Wankhede Stadium Viral Video: वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमासाठी मुंबईकर क्रिकेटपटू वानखेडे स्टेडियममध्ये हजर होते. या कार्यक्रमातील रोहित शर्माचा एक…

Why Shreyas Iyer and KKR Parted Aways Despite Winning Title in His Captaincy
Shreyas Iyer: श्रेयस अय्यर आणि KKR यांची का झाली ताटातूट? जेतेपद पटकावल्यानंतरही का केलं नाही रिटेन?

Shreyas Iyer on KKR Release before IPL 2025 Auction: श्रेयस अय्यर हा आयपीएल २०२५ च्या ऑक्शनमधील दुसरा सर्वात महागडा खेळाडू…

punjab kings new captain announced in 18 big boss
‘पंजाब किंग्ज’च्या नव्या कर्णधाराचे नाव ‘बिग बॉस १८’ मध्ये झाले जाहीर; ‘या’ स्टार खेळाडूकडे सोपवली धुरा

अभिनेत्री प्रीती झिंटा सहमालक असलेल्या ‘पंजाब किंग्ज’ या आयपीएल टीमच्या कॅप्टनची घोषणा सलमान खान होस्ट करत असलेल्या ‘बिग बॉस १८’…

Shreyas Iyer 40 Runs Inning Made Mumbai Win in Low Scoring Match vs Hyderabad Vijay Hazare Trophy
Shreys Iyer: श्रेयस अय्यरची कमाल, ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला अन् २० चेंडूत पालटला सामना; मुंबईचा दणदणीत विजय

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा संघासाठी अप्रतिम खेळी केली. तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्त्व करत आहे आणि नवव्या…

suryansh shedge
Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेची निर्णायक खेळी; सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबई ‘अजिंक्य’

Syed Mushtaq Ali Trophy 2024: सूर्यांश शेडगेच्या १५ चेंडूत ३६ धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचं जेतेपद पटकावलं.

Rishabh Pant, Venkatesh Iyer, Shreyas Iyer
पंत, श्रेयस आणि वेंकटेश ‘आयपीएल’ लिलावात महागडे खेळाडू कसे ठरले? वेगवान गोलंदाजांना अधिक मागणी का?

आयपीएलच्या ताज्या लिलावात अनेक धक्कादायक बोली दिसून आल्या. भारतीय खेळाडूंसाठी हा लिलाव विशेष लाभदायी ठरला.

IPL 2025 Auction: Which Teams Got Their Captains on 1st Day of Mega Auction?
IPL Auction 2025: पहिल्याच दिवशी ‘या’ ४ संघांना मिळाला कर्णधार, तीन खेळाडू ठरले IPL इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ च्या लिलावाच्या पहिल्या दिवशी पाचपैकी ३ संघांना कर्णधार मिळाले आहेत. या तिघांवरही १० कोटीच्या वर…

Shreyas Iyer Most Expensive Player in IPL History with Record break Bidding
Shreyas Iyer IPL 2025 Auction: २६.७५ कोटी! श्रेयस अय्यर ठरला आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्सने लावली तगडी बोली

Shreyas Iyer Sold for 25.75 Crore in IPL 2025 : श्रेयस अय्यरवर आयपीएल लिलावात तुफान बोली लागत होती. अखेरीस श्रेयस…

Shreyas Iyer hits century off 47 balls in Syed Mushtaq Ali Trophy 2025
Shreyas Iyer : IPL 2025 लिलावापूर्वी श्रेयस अय्यरचा मोठा धमाका; षटकार-चौकारांचा पाऊस पाडत गोव्याविरुद्ध झळकावले वादळी शतक

Shreyas Iyer century : श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाकेदार शतक झळकावले आहे. या शतकी खेळीत त्याने षटकार आणि…

ताज्या बातम्या