डॉ. श्रीकांत शिंदे Photos
डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.
Read More