श्वेता तिवारी Videos
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) ही हिंदी टेलिव्हिजन विश्वामध्ये काम करणारी अभिनेत्री आहे. ४ ऑक्टोबर १९८० रोजी तिचा जन्म झाला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. अभिनय करण्यासाठी नव्वदच्या दशकामध्ये तिने मुंबई गाठली. सुरुवातीला मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा केल्यानंतर श्वेताला २००१ मध्ये मोठा ब्रेक मिळाला. ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमध्ये तिने प्रेरणा शर्मा ही प्रमुख भूमिका साकारली.
२००१ ते २००८ पर्यंत ही मालिका सुरु होती. याच काळात श्वेताने हिंदी, भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केले. तिने मालिकांव्यतिरिक्त ‘खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलत दिखला जा’ यांसारख्या रिअॅलिटी शोजमध्येही सहभाग घेतला होता. श्वेताच्या मालिका, चित्रपटांप्रमाणे तिचे खासगी आयुष्य देखील चर्चेत राहिले. १९९८ मध्ये तिने भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केला. त्यांच्या मुलीचे नाव पलक आहे.
राजाचे दारुचे व्यसन आणि घरगुती हिंसा याला कंटाळून तिने २००७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहली या अभिनेत्याशी लग्न केले. तीन वर्षांनी त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव रियांश कोहली आहे. २०१९ मध्ये तिने अभिनवविरोधात हिंसाचाराचे आरोप करत केले. या प्रकरणी त्याला शिक्षा झाली. त्याच वर्षी श्वेता आणि अभिनव वेगळे झाले.Read More