सिद्धरामय्या Videos

siddaramaiah
सिद्धरामय्या (siddaramaiah)हे कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा जन्म १२ ऑगस्ट १९४८ रोजी कर्नाटकातील सिद्धरामणाहुड्डी येथे झाला. मे २०१३ मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सिद्धरामय्या हे कर्नाटक राज्याचे २२ वे मुख्यमंत्री बनले. यापूर्वी १९९६ -१९९९ आणि २००४-२००५ दरम्यान त्यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीपदही भूषवले.

राज्यातील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते सिद्धरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण कर्नाटकातील लिंगायत आणि वोक्कालिगा समुदायांतून त्यांना विरोध असल्याचे दिसून येत आहे.

सिद्धरामय्या यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात सामाजिक-आर्थिक सुधारणा योजनांमधून कर्नाटकात अनेक बदल घडवून आणले. तसेच त्यांनी गरिबांसाठीही अनेक योजना सुरू केल्या. त्यांच्या अन्न-भाग्य योजना, सर्व शालेय विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम दूध देणे आणि इंदिरा कॅन्टीनमुळे गरिबांना मोठे साहाय्य मिळाले. त्यांनी बेरोजगारी, शिक्षण, स्त्री आणि बालमृत्यू रोखण्यासाठी योजना आणल्या, ज्याने लाखो गरीब कुटुंबांना दिलासा मिळाला.

सिद्धरामय्या यांनी मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरणावर विशेष भर दिला. पण त्यांनी मागील सरकारच्या काळात घेतलेल्या काही निर्णयांमुळे लिंगायत, विशेषत: हिंदू मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता कमी होत गेली.
Read More

ताज्या बातम्या