सिद्धार्थ चांदेकर Videos

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरचा जन्म १४ जून १९९१ रोजी झाला. पुण्यामध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासून अभिनयाची आवड असणाऱ्या सिद्धार्थने हमने जीना सीख लिया या हिंदी चित्रपटामार्फत कलाविश्वामध्ये पदार्पण केले. २०१० मध्ये सुरु झालेल्या अग्निहोत्र या दर्जेदार मालिकेमध्ये त्याने नील अग्रिहोत्री हे पात्र साकारले होते. या मालिकेमुळे सिद्धार्थला खूप लोकप्रियता मिळाली. त्याच वर्षी त्याचा झेंडा हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. त्याने बालगंधर्व, लग्न पाहावे करुन, क्लासमेट्स, वजनदार, गुलाबजाम, झिम्मा यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय तो जिवलगा, सांग तू आहेस ना अशा मालिकादेखील केल्या आहेत. सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. झिम्मा २ मध्ये तो झळकणार आहे असे म्हटले जात आहे. सिद्धार्थ २१ जानेवारी २०२१ रोजी मिताली मयेकरशी लग्न केले. लग्नापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. सिद्धार्थ चांदेकर अभिनयासह सूत्रसंचालनामध्येही निपुण आहे. Read More
Fasklas Dabhade team visited Jejuri Khandoba Devasthan
फस्क्लास दाभाडेच्या टीमची खंडोबा चरणी भेट; सिद्धार्थसाठी मितालीने घेतला एक नंबर उखाणा

फस्क्लास दाभाडे या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता अमेय वाघ, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, तसेच अभिनेत्री मिताली मयेकर, क्षिती जोग हे…

सई-सिद्धार्थची रोमँटिक केमिस्ट्री, किसिंग सीन अन्...; 'श्रीदेवी प्रसन्न'च्या शूटिंगचे भन्नाट किस्से
सई-सिद्धार्थची रोमँटिक केमिस्ट्री, किसिंग सीन अन्…; ‘श्रीदेवी प्रसन्न’च्या शूटिंगचे भन्नाट किस्से

प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार या आगळ्यावेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या…

ताज्या बातम्या