सिद्धार्थ जाधव News

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम करण्यांचा दांडगा अनुभव असणाऱ्या सिद्धार्थ जाधवचा (Siddharth Jadhav) जन्म २१ ऑक्टोबर १९८१ रोजी मुंबईमध्ये झाला. रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याने एकांकिकांमध्ये काम करायला सुरुवात केली. सह्याद्री वाहिनीवरील ‘एक शून्य बाबुराव’ कार्यक्रमाद्वारे त्याने कलाक्षेत्रामध्ये अधिकृत प्रवेश केला.

‘हसा चकट फू’, ‘घडलंय बिघडलंय’ अशा मालिकांमध्ये तो झळकला. पुढे २००४ मध्ये ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील काम पाहून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याला ‘जत्रा’ चित्रपटामध्ये काम करायची ऑफर दिली. या चित्रपटामुळे सिद्धार्थला लोकप्रियता मिळाली. २००६ मध्ये ‘गोलमाल’ या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला. ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘दे धक्का’, ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘धुरळा’, ‘ये रे ये रे पैसा’ असे अनेक दर्जेदार चित्रपट त्याने केले आहेत. ‘आम्ही सुभाष बोलची’ या बंगाली चित्रपटामध्येही त्याने काम केले आहे.

‘सिंबा’, ‘सर्कस’, ‘राधे’ यांसारख्या बिगबजेट चित्रपटांसाठीही (Bigg Budget Movie) त्यांची निवड करण्यात आली होती. सिद्धार्थच्या पत्नीचे नाव तृप्ती असून त्यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणारा सिद्धार्थ त्याच्या मुलींबरोबरचे फोटो, व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो.
Read More
siddharth jadhav friendship with director rohit shetty
रोहित शेट्टी सरांच्या ऑफिसमध्ये न सांगता गेलो अन्…; सिद्धार्थ जाधवने सांगितला भन्नाट किस्सा; म्हणाला, “त्यांचा साधेपणा पाहून…”

Siddharth Jadhav & Rohit Shetty : रोहित शेट्टीचा साधेपणा पाहून भारावून गेला होता सिद्धार्थ जाधव, किस्सा सांगत म्हणाला…

Siddharth Jadhav
वाढलेलं जेवण सरकवलं आणि वडिलांनी…; सिद्धार्थ जाधवने संताप अनावर होऊन केलेली ‘ही’ गोष्ट, म्हणाला, “मी स्टूल…”

Siddharth Jadhav on His Anger Issues: रागामुळे गोष्टी बिघडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे? अभिनेत्याने दिला सल्ला, म्हणाला…

siddharth jadhav
“आमचं नातं डेंजर आहे”, सिद्धार्थ जाधवचे लेकींबरोबर ‘असे’ आहे बॉण्डिंग; म्हणाला…

Siddharth Jadhav: “दोघींना माझी कामं…”, सिद्धार्थ जाधव लेकींबद्दल झाला व्यक्त; काय म्हणाला अभिनेता? घ्या जाणून…

siddharth jadhav shared a post about his mother maharashtra bhushan rajmata jijau award 2025 award
“आये आता थांबायच नाय!” सिद्धार्थ जाधवच्या आईला मिळाला ‘हा’ विशेष पुरस्कार, अभिनेता अभिमानास्पद पोस्ट शेअर करत म्हणाला…

सिद्धार्थ जाधवच्या आईचा ‘या’ विशेष पुरस्काराने गौरव, अभिनेत्याने शेअर केली अभिमानास्पद पोस्ट, म्हणाला…

siddharth jadhav started production house and comeback in natak
करिअरला २५ वर्षे पूर्ण होताच सिद्धार्थ जाधवने केली मोठी घोषणा! आई-वडिलांच्या नावाने सुरू केली ‘ही’ खास गोष्ट; म्हणाला…

Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधव रंगभूमीवर पुनरागमन करणार…; करिअरला २५ वर्षे पूर्ण होताच आई-बाबांसाठी केली ‘ही’ खास गोष्ट

Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ

Siddharth Jadhav: लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधवचा डान्स पाहिलात का?

sequel of Siddharth Jadhavs film Huppa Huyya
आणि. . . नव्या वर्षाची भेट मिळाली : सिद्धार्थ जाधव, १५ वर्षांनंतर ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला

‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाचा सिक्वेल तब्बल १५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Siddharth Jadhav wife new homestay business
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवा व्यवसाय! तृप्तीने अलिबागमध्ये सुरू केला सुंदर Homestay; अभिनेता म्हणाला, “तुझं स्वप्न…”

सिद्धार्थ जाधवच्या पत्नीने अलिबागमध्ये सुरू केला नवीन व्यवसाय, चाहत्यांना दाखवली होमस्टेची झलक

ताज्या बातम्या