सोलापूर (Solapur) हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेकडे असून जिल्हाची सीमा कर्नाटक (Karnataka) राज्याला संलग्न आहे. १६ गाव एकत्र झालेल्या तयार झालेल्या शहराला सोलापूर हे नाव पडले असे म्हटले जाते.
पंढरपूर (Pandharpur) आणि अक्कलकोट अशी अनेक महत्त्वपूर्ण देवस्थानं या जिल्ह्यामध्ये आहेत. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, बार्शी, मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मोहोळ, माढा, करमाळा या तालुक्यांनी हा जिल्हा तयार झाला आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सोलापूरचे क्षेत्रफळ १४,८९५ चौरस किमी आहे.
पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी या तीन भाषांचा त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा यासाठी सोलापूर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) पुणे विभागामध्ये सोलापूरचा समावेश होतो. Read More
दुपारच्या रणरणत्या उन्हात चार हुतात्मा पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चात हजारापेक्षा अधिक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस डोक्यावर छत्री घेऊन सहभागी झाल्या…
न्यायालयीन खटल्यात हजर राहण्यासाठी न्यायालयात आलेल्या आरोपीला न्यायाधीशांच्या परवानगीशिवाय अटक करून न्यायालयीन प्रक्रियेस अडथळा आणल्याप्रकरणी चार पोलिसांच्या विरोधात संबंधित आरोपीने…
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आगामी २०२५-२६ शैक्षणिक वर्षाचा २५१ कोटी ३६ लाख २५ हजार रुपयांचा अर्थसंकल्प विद्यापीठाच्या अधिसभेत मंजूर…