सोनाली बेंद्रेचा जन्म १ जानेवारी १९७५ रोजी मुंबईतील एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला. सोनालीचे सुरुवातीचे शिक्षण बंगळुरू येथील ‘केंद्रीय विद्यालय’ येथे झाले, नंतर तिने मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयातून शिक्षण घेतले. सोनालीने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. मॉडेलिंग दरम्यानच सोनालीला १९९४ मध्ये पहिल्या चित्रपटाची ऑफर आली आणि तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ‘आग’ होते. या चित्रपटात गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांनीही काम केले होते. या चित्रपटातील सोनालीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ज्यासाठी तिला ‘न्यू फेम ऑफ द इयर फिल्मफेअर’ आणि ‘स्टार स्क्रीन मोस्ट प्रॉमिसिंग न्यूकमर’ हे पुरस्कारही देखील मिळाले. १९९६ मध्ये आलेल्या ‘दिलजले’ या चित्रपटाने तीला भरपूर लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात अजय देवगणही मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर तिने कादर खान, सुनील शेट्टी, शक्ती कपूरबरोबर ‘भाई’ आमिर खानचा ‘सरफरोश’, शाहरुख खानबरोबर ‘डुप्लिकेट’ सारखे चित्रपट केले. करिश्मा कपूर आणि सैफ अली खानसह ‘हम साथ साथ है’ आणि ‘अनाहत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मध्यंतरी सोनालीला कॅन्सरदेखील झाला होता ज्याच्यावर मात करून तिने पुन्हा ओटीटीच्या माध्यमातून मनोरंजन विश्वात कमबॅक केला आहे.Read More