सोनाली कुलकर्णी News
मराठी चित्रपटसृष्टीमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नाव आवर्जून घेतलं जातं. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे हा तिचा पहिला मराठी चित्रपट. पहिल्याच चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा झी गौरव पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीने ग्रँड मस्ती, सिंघम २ या हिंदी चित्रपटांमध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली. तिच्या नृत्य कौशल्याचे तर लाखो चाहते आहेत. नटरंग चित्रपटामध्ये अप्सरा आली या गाण्यावर तिने केलेलं लावणी नृत्य सुपरहिट ठरलं. इरादा पक्का, अजिंठा, बघतोस काय मुजरा कर, तुला कळणार नाही, टाईमपास २, विकी वेलिंगकर, हिरकणी, धुरळा, झिम्मा, पांडू, पोश्टर गर्ल, क्लासमेट्स, रमा माधव असे अनेक सुपरहिट चित्रपट तिने मराठी चित्रपटसृष्टीला दिले. तसेच तीन मराठी फिल्मफेअर पुरस्कार, तीन झी चित्र गौरव पुरस्कार सोनालीच्या नावे आहेत. अप्सरा आली, युवा डान्सिंग क्वीन या डान्स रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची धुरा देखील सोनालीने उत्तमरित्या सांभाळली. Read More