scorecardresearch

दहावी निकाल २०२५

दहावी (SSC) हे वर्ष प्रत्येक विद्यार्थासाठी खूप महत्त्वपूर्ण वर्ष असते. दहावीमध्ये मिळावलेल्या गुणांच्या आधारे आयुष्याची पुढील वाटचाल ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थी अधिक मेहनत करण्याच्या तयारीत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ दरवर्षी दहावीची परीक्षा म्हणजेच एसएससीची परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी एसएससीची परीक्षा देत असतात. त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घेतात. पण चांगल्या आणि नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण असावे लागतात.


या कारणामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावीला जास्तीचे कष्ट घेत असतात, जेणेकरुन चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेता येईल. दहावीची परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. त्यानंतर मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसएससीचा निकाल लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देखील असतात. या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जातात आणि काही महिन्यात लगेच त्यांचे निकाल जाहीर केले जातात.


आजकाल महाविद्यालयांतील प्रवेशासाठी कटऑफमध्ये खूप जास्त स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यामधील एसएससीच्या निकालाचा विचार करायला गेल्यावर अनेकदा कोकण विभागाने त्यामध्ये बाजी मारल्याचे लक्षात येते. लोकसत्ता डॉट कॉमच्या एसएससी या पेज/सदरावर इयत्ता दहावी, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा, परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकालाचे वेळापत्रक अशा संपूर्ण गोष्टींची माहिती वाचकांना वाचायला मिळेल. त्याशिवाय दहावीनंतर काय करावे याबाबतचे काही आर्टिकल्स पाहायला मिळतील.


Read More
BMC Additional Commissioner honors SSC exam passers news in marathi
दहावीतील गुणवंतांच्या पाठीवर अतिरिक्त आयुक्तांची कौतुकाची थाप; पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. सैनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

Student Gauri Kharat who passed 10th died in April shocking teachers and classmates
दहावीच्या परीक्षेत गौरी पास झाली, पण …

विद्यार्थिनी गौरी खरात हिचे एप्रिल महिन्यात निधन झाले. दहावीच्या निकालात ती उत्तीर्ण झाली, उत्तीर्ण झालेली गौरी आज आपल्यात नसल्याची बाब…

mother daughter academic achievement news in marathi
आई- मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळवले यश; आई रीना आणि मुलगी तन्वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

आई – मुलीच्या या जोडीच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

motivational grandma story in marathi
हिंगणघाटच्या आजींची कमाल…वयाच्या ६८ व्या वर्षी नातवासह केली दहावीची परीक्षा उत्तीर्ण, इंदू सातपुते यांना ५१.०० टक्के गुण

आजी – नातूची ही जोडी अनेकांसाठी आदर्श बनली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Bhagyashree Kamble ssc exam news in marathi
नऊ महिन्यांची गरोदर… पण माघार घेतली नाही…पेणच्या भाग्यश्री कांबळे यांनी दहावीत मिळवले ३९ टक्के गुण

पेणमधील भाग्यश्री कांबळे यांचे बालपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बापेरे या गावात गेले. भाग्यश्री कांबळे दीड वर्षांच्या असतानाच वडिलांचे…

CBSE Exam Results 2025 Srishti Sharma
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…” फ्रीमियम स्टोरी

CBSE Results 2025 : सृष्टी शर्मा म्हणाली, “मी कधीच ट्युशन (खासगी शिकवणी) लावली नाही. त्याऐवजी मी दररोज २०-२० तास अभ्यास…

Amrita Gurav passes 10th standard after overcoming cancer vasai news
कर्करोगावर मात करीत अमृता गुरव दहावी उत्तीर्ण, मिळविले ८० टक्के गुण

विरारच्या गोकुळ टाऊनशिप येथे राहणाऱ्या अमृता गुरव या विद्यार्थ्यीनीने दहावीच्या परीक्षेत  कर्करोगाशी झुंज देत अभूतपूर्व यश मिळवले आहे.

happy home and school for the blind
वरळीतील ‘हॅपी होम’ अंध शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के

वरळीतील ‘द हॅपी होम अँड स्कूल फॉर द ब्लाइंड’ या वसतिगृहात्मक अंध शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. या शाळेतील सर्वच्या…

Results of four Thane Municipal Corporation schools are 100 percent thane news
ठाणे पालिकेच्या चार शाळांचा निकाल १०० टक्के; गतवर्षीपेक्षा यंदा गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दहावीच्या निकालातून स्पष्ट

ठाणे महापालिका शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम मंगळवारी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालातून…

Shardul Auti
डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील शार्दुल औटीने दृष्टीदोषावर मात करत मिळविले ९७ टक्के गुण; कल्याणमधील कचरावेचकांच्या मुलांचे यश

दृष्टी दोष असुनही त्यावर मात करत, डोंबिवलीतील टिळकनगर शाळेतील शार्दुल संतोष औटी या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळविले…

संबंधित बातम्या