scorecardresearch

दहावी निकाल २०२५ News

दहावी (SSC) हे वर्ष प्रत्येक विद्यार्थासाठी खूप महत्त्वपूर्ण वर्ष असते. दहावीमध्ये मिळावलेल्या गुणांच्या आधारे आयुष्याची पुढील वाटचाल ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थी अधिक मेहनत करण्याच्या तयारीत असतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ दरवर्षी दहावीची परीक्षा म्हणजेच एसएससीची परीक्षा घेतली जाते. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी एसएससीची परीक्षा देत असतात. त्यातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील शिक्षण घेण्यासाठी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीन शाखांपैकी एका शाखेची निवड करुन महाविद्यालयात प्रवेश घेतात. पण चांगल्या आणि नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांना दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण असावे लागतात.


या कारणामुळे अनेक विद्यार्थी इयत्ता दहावीला जास्तीचे कष्ट घेत असतात, जेणेकरुन चांगल्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश घेता येईल. दहावीची परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान असते. त्यानंतर मे महिन्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एसएससीचा निकाल लागतो. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा देखील असतात. या परीक्षा जुलै महिन्यात घेतल्या जातात आणि काही महिन्यात लगेच त्यांचे निकाल जाहीर केले जातात.


आजकाल महाविद्यालयांतील प्रवेशासाठी कटऑफमध्ये खूप जास्त स्पर्धा असल्याचे पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यामधील एसएससीच्या निकालाचा विचार करायला गेल्यावर अनेकदा कोकण विभागाने त्यामध्ये बाजी मारल्याचे लक्षात येते. लोकसत्ता डॉट कॉमच्या एसएससी या पेज/सदरावर इयत्ता दहावी, त्याचा अभ्यासक्रम, परीक्षा, परीक्षेचे वेळापत्रक तसेच निकालाचे वेळापत्रक अशा संपूर्ण गोष्टींची माहिती वाचकांना वाचायला मिळेल. त्याशिवाय दहावीनंतर काय करावे याबाबतचे काही आर्टिकल्स पाहायला मिळतील.


Read More
Results of 10th-12th re-examination declared in Palghar district
पालघर जिल्ह्यात दहावी-बारावी फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; दहावीचा २१ टक्के तर बारावीचा ३४ टक्के निकाल

फेब्रुवारी व मार्च २०२४-२५च्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जून जुलै महिन्यात पार पडली. दहावीच्या फेरपरीक्षेत एकूण १०७८ विद्यार्थी तर…

maharashtra State board declared results of 10th and 12th supplementary exam
पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर… बारावीच्या निकालात वाढ, दहावीच्या निकालात घट!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.

Revaluation requests are rising for Maharashtra Board Class 10th and 12 th exams after result announcements
दहावी-बारावी उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकन अर्जसंख्येत वाढ; राज्य मंडळाच्या आकडेवारीतून चित्र स्पष्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (राज्य मंडळ) दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचा उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्याकडे कल वाढत आहे.दोन्ही परीक्षांच्या…

digital locker class 10 marksheet news in marathi
दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांच्या डिजिलॉकरमध्ये उपलब्ध

य परीक्षेला राज्यभरातून यंदा १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४७७ विद्यार्थी उत्तीर्ण…

Class 10th mark sheets will be available on Monday, distributed in schools after 3 pm
दहावीच्या गुणपत्रिका सोमवारी मिळणार, दुपारी ३ वाजल्यानंतर शाळेत वितरण

याबाबत विभागीय मंडळांमार्फत सर्व माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आल्या असून, शाळेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन…

BMC Additional Commissioner honors SSC exam passers news in marathi
दहावीतील गुणवंतांच्या पाठीवर अतिरिक्त आयुक्तांची कौतुकाची थाप; पुस्तके, पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यार्थ्यांनी या मुक्त संवादात आपण भविष्यात कोणता शैक्षणिक मार्ग निवडणार याबाबत सांगितले. सैनी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…

mother daughter academic achievement news in marathi
आई- मुलीने दहावीच्या परीक्षेत मिळवले यश; आई रीना आणि मुलगी तन्वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

आई – मुलीच्या या जोडीच्या यशाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

motivational grandma story in marathi
हिंगणघाटच्या आजींची कमाल…वयाच्या ६८ व्या वर्षी नातवासह केली दहावीची परीक्षा उत्तीर्ण, इंदू सातपुते यांना ५१.०० टक्के गुण

आजी – नातूची ही जोडी अनेकांसाठी आदर्श बनली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Bhagyashree Kamble ssc exam news in marathi
नऊ महिन्यांची गरोदर… पण माघार घेतली नाही…पेणच्या भाग्यश्री कांबळे यांनी दहावीत मिळवले ३९ टक्के गुण

पेणमधील भाग्यश्री कांबळे यांचे बालपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील बापेरे या गावात गेले. भाग्यश्री कांबळे दीड वर्षांच्या असतानाच वडिलांचे…

CBSE Exam Results 2025 Srishti Sharma
ट्युशनशिवाय CBSE च्या १० वीच्या परीक्षेत ५०० पैकी ५०० गुण मिळवणाऱ्या सृष्टी शर्माचा यशाचा मार्ग; म्हणाली, “मी पुस्तकातील…” फ्रीमियम स्टोरी

CBSE Results 2025 : सृष्टी शर्मा म्हणाली, “मी कधीच ट्युशन (खासगी शिकवणी) लावली नाही. त्याऐवजी मी दररोज २०-२० तास अभ्यास…