एसटी संप Photos

महाराष्ट्राची लालपरी (Maharashtra ST) समजल्या जाणाऱ्या एसटीचा (ST) वापर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. असे असूनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंंडळावर कर्जाचा मोठा डोंगर असल्याची माहिती समोर आली होती.

महामंडळातील कर्मचाऱ्याचे वेतन तुलनेने कंमी असून ते वेळेवर न मिळत असल्याने त्यांचे हाल होत असतं. त्यांना अन्य सोयी देखील उपलब्ध नसल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत होता. जर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन झाले, तर त्यांना सरकारी सोयीसुविधा प्राप्त होतील या आशेने महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांनी २०२१ मध्ये आंदोलन (ST Strike) केले होते. आंदोलनामुळे महामंडळाने कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचे आदेश दिले. स्थिती बिघडताच हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहोचले. तेव्हा न्यायालयाने महामंडळाच्या बाजूने निर्णय देत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आदेश दिला. त्यानंतर कर्मचारी हळूहळू कामावर जाऊ लागले आणि आंदोलनाचा प्रभाव कमीकमी होत गेला. Read More

ताज्या बातम्या