सुधीर मुनगंटीवार News

सुधीर मुनगंटीवार हे राजकारणी असून ते भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म ३० जुलै १९६२ रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. मुनगंटीवार यांनी एम. कॉम., एल. एल. बी., एम. फिल., डी. बी. एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत.


सुधीर मुनगंटीवार यांनी महाविद्यालयात असताना १७ व्या वर्षी छात्रसंघाची निवडणूक लढवली होती. तसेच या निवडणुकीत त्यांनी विजयही मिळवला होता. सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून ते सरचिटणीसपदी निवडून आले होते. त्यानंतर १९८१ मध्ये ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले.


सुधीर मुनगंटीवार यांनी १९९५ मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी ५५ हजार मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर सलग ६ वेळा ते चंद्रपूर मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-सेनेच्या युती सरकारमध्ये ते पर्यटन आणि ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्रीदेखील होते. २००९ ते २०१३ दरम्यान, ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. सुधीर मुनगंटीवर हे विद्यमान महाराष्ट्र सरकारमध्ये सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या खात्यांचे मंत्री आहेत.


Read More
Image Of Ajit Pawar.
Ajit Pawar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला अजित पवार अनुपस्थित; मुनगंटीवार म्हणाले, “अजित दादांना निमंत्रण…”

RSS Headquarters : हिवाळी अधिवेशन सुरू असताना आज नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचे बैद्धिक होणार आहे.

Sudhir Mungantiwar on ministerial post
Sudhir Mungantiwar: ‘शपथविधी सोहळा होईपर्यंत माझं नाव यादीत होतं’ मंत्रिपदाबाबत सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Sudhir Mungantiwar on ministerial post: भाजपाचे ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रीपद न दिल्यामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.…

Devendra fadnavis
चंद्रपूर : मुनगंटीवार समर्थक मुख्यमंत्री फडणवीसांच्या द्वारी, मंत्रिमंडळातील समावेशासाठी…

आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्यात सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे.

Raosaheb Danve On Chhagan Bhujbal
Raosaheb Danve : “छगन भुजबळांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही? हे फक्त अजित पवार…”, रावसाहेब दानवेंनी स्पष्ट सांगितलं

Raosaheb Danve : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देत मोठं भाष्य केलं आहे.

Sudhir Mungantiwar meets Nitin Gadkari,
Sudhir Mungantiwar : “मी नाराज नाही, आमदार म्हणून जनतेचे प्रश्न मांडणार,” सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती…

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

Sudhir Mungantiwar minister post , Sudhir Mungantiwar Chandrapur, Sudhir Mungantiwar latest news,
गटबाजी, कुरघोडीच्या राजकारणामुळे मुनगंटीवार मंत्रिपदाला मुकले!

जिल्ह्यात सहापैकी पाच आमदार भाजपचे निवडून आल्यानंतरही पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे मंत्रिपद हुकले.

Chhagan Bhujbal Sudhir Mungantiwar unhappy over being left out of cabinet expansion Nagpur news
महायुतीमध्ये असंतोष; मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्याने भुजबळ, मुनगंटीवार यांची नाराजी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीतील तीनही पक्षांमध्ये असंतोषाचा भडका उडाला असून मंत्रीपद न मिळालेले नेते संतप्त झाले आहेत. छगन भुजबळ, सुधीर मुनगंटीवार…

devendra fadnavis on sudhir mungantiwar
Devendra Fadnavis : “…म्हणून सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात घेतलं नाही”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट

मंत्रिमंडळात न घेतल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा आहे. या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय.

What sudhir Mungantiwar Said?
Sudhir Mungantiwar : मंत्रिपद नाकारल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना प्रमोद महाजनांची आठवण, “कितीही गोष्टी मनाविरुद्ध घडल्या तरीही…”

Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवार म्हणाले मला मी मंत्रिमंडळात नसेन हे कुणीही सांगितलं नव्हतं.

minister post Chandrapur, Devendra Fadnavis Cabinet,
राज्याला मुख्यमंत्री देणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान नाही

मुख्यमंत्रीपासून तर अर्थमंत्री अशी मोठ मोठी मंत्रिपदे देणाऱ्या या जिल्ह्याला पंधरा वर्षांनंतर प्रथमच मंत्रिपद मिळालेले नाही.

ताज्या बातम्या