आत्महत्या News

स्वतःच स्वतःचे आयुष्य संपविण्याचे कृत्य म्हणजे आत्महत्या होय. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपले जीवन निरर्थक किंवा नीरस वाटते तेव्हा त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे (Subside) विचार येतात. यामागे अनेक कारणे असू शकतात. जीवनामध्ये सतत येणारं अपयश, आर्थिक संकटे, नातेसंबंधांतील गुंतागुत अशी आत्महत्येमागील कारणे असण्याची शक्यता असते. काही वेळेस मानसिक आजारांमुळेही आत्महत्या करण्याचे विचार मनामध्ये येत असतात. मानसिक त्रास, असहाय्यता संपवण्याच्या उद्देशाने लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. आकडेवारीनुसार, जगभरात दर वर्षी सुमारे दहा लाख लोक आत्महत्या करायचा प्रयत्न करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, मानवी मृत्यूच्या कारणांच्या क्रमवारीमध्ये आत्महत्या हे तेराव्या क्रमांकावरचे कारण आहे.


ब्रिटीश काळातील भारतीय दंड संहिता १८६० मध्ये असलेल्या कलम ३०९ नुसार आत्महत्या करणे हे कायद्याने गुन्हा आहे असे नमूद करण्यात आले होते. या कलमानुसार, “जो कुणी आत्महत्येचा प्रयत्न करील आणि असा अपराध घडण्याच्या दृष्टीने कोणतीही कृती करील त्याला एक वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील” हे कलम जुनाट असून त्यावर अनेकदा टीका झाली. १९७१ मध्ये हे कलम रद्द करण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न केले गेले. पुढे अनेकदा त्यावर चर्चा झाल्या. २००८ मध्ये विधी आयोगाच्या २१० व्या अहवालामध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला वैद्यकीय आणि मनोरुग्ण उपचारांची गरज आहे, शिक्षेची नाही. असे नमूद करण्यात आले. पुढे २०१७ मध्ये याविशयी विधेयक आणून २०१८ मध्ये ते अमलात आले.


मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (१) मध्ये म्हटले की, भारतीय दंड संहितेच्या कलम ३०९ व्याख्येनुसार काहीही असले तरी आत्महत्येचा प्रयत्न करणारी कोणतीही व्यक्ती, गंभीर ताणतणावात असल्याचे गृहित धरले जाईल आणि या संहितेमनुसार सदर व्यक्तीविरोधात खटला चालवला जाणार नाही आणि त्याला शिक्षा दिली जाणार नाही.मानसिक आरोग्य विधेयकाच्या कलम ११५ (२) नुसार, आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीने पुन्हा अशा प्रकारच्या कृत्याची पुनरावृत्ती करू नये किंवा तसा धोका निर्माण होऊ नये यासाठी संबंधित सरकारने अशा व्यक्तीची काळजी घेणे, त्याला उपचार देणे आणि त्याचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. सरकारचे हे कर्तव्य आहे.


या व्यतिरिक्त आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे हा भारतामध्ये मोठा गुन्हा मानला जातो. कलम १०६ नुसार, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस जर कुणी प्रवृत्त केले असेल तर त्याला दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच द्रवदंडांची शिक्षाही ठोठावली जाऊ शकते.” तर कलम १०५ नुसार “१८ वर्षांखालील कोणतीही व्यक्ती, मानसिक आजार असलेली कोणतीही व्यक्ती, कोणतीही भ्रमिष्ट व्यक्ती किंवा नशेच्या अमलाखाली असलेली व्यक्ती आत्महत्या करेल आणि अशा व्यक्तीच्या आत्महत्येसाठी जर कुणी जबाबदार असेल तर त्याला मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची किंवा दहा वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या मुदतीचा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होऊ शकते.”


प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास, दु:ख, वेदना असतात. प्रत्येकजण संकटांचा सामना करत असतो. तेव्हा अपयशाने खचून न जाता सतत संघर्ष करणे आवश्यक असते. आत्महत्या करणे हे कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही. आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्यास तुम्ही जवळच्या व्यक्तीची मदत घेऊन परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करु शकता. शासनही त्यामध्ये मदत करते. सरकारच्या अनेक हेल्पलाइन्स मानसिकदृष्टा खचलेल्या व्यक्तीच्या मदतीसाठी तत्पर असतात.


Read More
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह

कळवा येथे आठवड्यापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

घरात पाळलेल्या दोन मांजरी आणि सरडा यांचा विरहाच्या भीतीने नैराश्यात गेलेल्या मिरा रोड मधील २७ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या…

sucide pod controversy
सुसाईड पॉडमध्ये महिलेचा रहस्यमयी मृत्यू? मृत्यूचे कारण आत्महत्या की हत्या? यावरून सुरू झालेला नवा वाद काय?

Sarco pod death controversy सुसाईड पॉडचा वापर २३ सप्टेंबर रोजी एका ६४ वर्षीय महिलेने केला आणि आपले जीवन संपवले. या…

youth upload selfie video before commit suicide
मृत्यूपूर्वी चित्रफीत अपलोड करून तरूणाची आत्महत्या

याप्रकरणी चित्रफितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी गुरुवारी केबल व इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनतील तीन कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

Delhi 17-Year-Old Girl Dies by Suicide After Failing to Crack JEE, Leaves Note for her parents Shocking video
“आई मला माफ कर, मी नाही करू शकले”; JEE परीक्षा पास होऊ न शकल्याने तरुणीची आत्महत्या; VIDEO पाहून काळजात होईल धस्स

Shocking Video: “आई मला माफ कर मी नाही करु शकले” असं म्हणत जेईई परीक्षा पास होऊ न शकल्यामुळे तिने हे…

Dombivli Nigerian citizen committed suicide by jumping from 15th floor
डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या

डोंबिवली येथील शिळफाटा रस्त्यावरील लोढा पलावा गृह प्रकल्पातील ॲड्रीना इमारतीच्या पंधराव्या माळ्यावरून उडी मारून एका ४२ वर्षाच्या नायजेरीयन नागरिकाने आत्महत्या…

navi mumbai female police officer commited suicide due to husbands misbehavior and taunts
तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला पोलीसाची आत्महत्या  

नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणा-या एका महिला पोलीसाने पतीच्या वेळोवेळीच्या वागणूक आणि टोमण्यांना वैतागूण आत्महत्येचा मार्ग निवडला.

iit delhi student suicide news marathi
IIT विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृत्यू, आत्महत्येचा संशय; हत्येची शक्यता पोलिसांनी फेटाळली!

IIT Delhi: दिल्ली आयआयटीमध्ये एका विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये संशयास्पदरीत्या मृत्यू झाला असून पोलीस घटनेची चौकशी करत आहेत.

pune Sinhagad Road police arrested innkeeper along with his accomplice who was walking around with pistol
आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या; सातजणांविरुद्ध गुन्हा

आर्थिक फसवणुकीमुळे व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

ताज्या बातम्या