सुनेत्रा पवार या राजकीय नेत्या असून त्या राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत. सुनेत्रा पवार या राजकीय घराण्याची संबंधित असल्या, तरी त्यांनी सक्रीय राजकारणात कधीही भाग घेतला नव्हता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार गटाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांचा पराभव केला.
सुनेत्रा पवार यांचा जन्म १० ऑक्टोबर १९६३ मध्ये धाराशिवमधील तेर या गावात झाला. त्यांनी बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं असून त्यांना वाचन, चित्रकला आणि समाजकार्याची विशेष आवड आहे. सुनेत्रा पवार या बारामती हायटेक टेस्टटाईल पार्क तसेच एन्वार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया च्या अध्यक्षा आहेत. तसचे त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत. सुनेत्रा पवार यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार २०२३’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार देण्यात आला आहे.