अगदी लहान वयात लोकप्रियता मिळवण्याचे भाग्य फारच थोड्यांच्या वाट्याला येते. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हे त्यांपैकीच एक भाग्यवान क्रिकेटपटू (Cricketer) आहेत. भारताच्या क्रिकेट संघात नेहमी आघाडीच्या फलंदाजांची उणीव भासत असे. उंचीने कमी पण अंगाने बळकट असलेल्या सुनील यांनी ही उणीव भरून काढली. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात त्यांचे नाव गाजले. शतक आणि द्विशतक रचून त्यांनी सोबर्सच्या संघास सळो की पळो करून सोडले. ३० वर्षापेक्षा अधिक काळ ते समालोचक म्हणून काम करत आहेत.Read More