सुनील प्रभू News

सुनील प्रभू हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत. मुंबईमधील दिंडोशी विधानसभा मतदारसंघामधून ते आमदार आहेत. या बरोबरच मुंबई महानगरपालिकेचे प्रमुखपद त्यांनी भूषवलेलं आहे. ते मुंबई शहराचे ७३ वे महापौर म्हणून कार्यभार पाहिलेला आहे. सुनील प्रभू यांनी १९९२ मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर १९९७ मध्ये आरे कॉलनी भागातून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ते सलग चार वेळा नगरसेवक झाले. १९९७, २००२, २००७, २०१२ अशा चारवेळा ते नगरसेवकपदी निवडून आले होते. यानंतर २०१२ ते २०१४ या काळात त्यांनी मुंबई महापौरपदाची जबाबदारी सांभाळली. सुनील प्रभू यांना सर्वोत्तम वक्ता म्हणून ओळखलं जातं. २०१४ साली दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील प्रभू आमदार झाले. त्यानंतर पुन्हा २०१९ च्या निवडणुकीतही ते आमदार झाले. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली.


Read More
mla sunil prabhu complaint to bmc commissioner over defective water pump
पाणी उपसा करणारे पंप बंद, आपत्कालीन विभागात दूरध्वनीलाही प्रतिसाद नाही, आमदार सुनील प्रभू यांची आयुक्तांकडे तक्रार

मुंबईत बुधवारच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या नियोजनावर टीका होऊ लागली आहे