सनरायझर्स हैदराबाद Videos

सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) हा इंडियन प्रीमिअर लीगमधील संघ आहे. हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम हे या संघाचे होम ग्राऊंड आहे. सन टिव्ही नेटवर्क समूहाकडे या संघाची मालकी आहे. २००८ मध्ये हैदराबादचे प्रातिनिधित्त्व करणारा ‘डेक्कन चार्जर्स’ हा संघ स्थापन झाला होता. या संघाला पहिल्या काही हंगामांमध्ये यश मिळाले. पुढे २०१२ मध्ये काही आर्थिक कारणांमुळे डेक्कन चार्जर्सच्या मालकांनी संघाचा लिलाव केला. सन टिव्ही नेटवर्कचे कलानिथी मारन यांनी हैदराबाद संघाचे हक्क खरेदी केले. पुढे त्यांनी संघाचे नाव, लोगो व अन्य सर्व गोष्टी बदलल्या. तेव्हा डेक्कन चार्जर्सचा संघ सनरायझर्स हैदराबाद बनला. आतापर्यंत या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ८ खेळाडूंनी उचलली आहे. डेव्हिड वॉर्नर हा सनरायझर्स हैदराबादचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्त्वाखाली २०१६ मध्ये हैदराबादच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी जिंकली होती.


डेव्हिड वॉर्नरशी मतभेद झाल्यानंतर व्यवस्थापनाने केन विल्यमसनकडे नेतृत्त्व दिले. मागील काही हंगामांमध्ये या संघाने प्लेऑफमध्ये जागा मिळवली नाही आहे. २०२३ मध्ये आयपीएलच्या १६ व्या हंगामामध्ये दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.


Read More

ताज्या बातम्या