सर्वोच्च न्यायालय News

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
raj thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंच्या मनसेची मान्यता रद्द करा”, उभाविसेची सर्वोच्च न्यायालयात याचिका; म्हणाले, “गुन्हा दाखल करून…”

Raj Thackeray vs Uttar Bhartiya Vikas Sena : सुनील शुक्ला म्हणाले, “राज ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिला आहे असं…

Tamil Nadu Governor R N Ravi
‘विधेयके अडवून ठेवणे बेकायदेशीर’, सर्वोच्च न्यायालयाचा तमिळनाडूच्या राज्यपालांना दणका; १० विधेयके मंजूर

Supreme Court on Tamil Nadu Bills: तमिळनाडूच्या राज्यपालांनी १० विधेयके अडवून ठेवल्याचे कृत्य बेकायदेशीर असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

Wakf Act, Supreme Court , hearing , petitions,
‘वक्फ’ कायद्याविरोधात तातडीने सुनावणी, संबंधित याचिका एकत्रित करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार

‘वक्फ (दुरुस्ती) विधेयक २०२५’च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सहमती दर्शवली.

Dombivli 65 illegal building case Petitioner Sandeep Patil files caveat Supreme Court
डोंबिवली ६५ बेकायदा इमारत प्रकरणी याचिकाकर्ते संदीप पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल

शासनाने उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला तर पहिले आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी, यासाठी याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी…

Kancha Gachibowli forest issue
पाच लाख नोकऱ्यांसाठी ४०० एकरची जंगलतोड; काय आहे कांचा गचिबोवली वृक्षतोड प्रकरण?

Kancha Gachibowli forest issue सर्वोच्च न्यायालयाने तेलंगणा सरकारला कांचा गचिबोवली वनक्षेत्रातील जंगलतोड थांबविण्याचे निर्देश दिले.

Sanjay Raut, Shiv Sena (UBT) MP, declares the party will not challenge the Waqf (Amendment) Bill 2025 in the Supreme Court.
Waqf Amendment Bill: वक्फ विधेयकाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार का? संजय राऊत म्हणाले, “आता आमच्यासाठी…”

Waqf Amendment Bill: शिवसेनेने (उद्धव ठाकरे) संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केले होते.

judge Yashwant Varma House Case
Yashwant Varma : न्यायमूर्ती यशवंत वर्मांनी घेतली अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाची शपथ; घरात रोकड सापडल्याने आले होते चर्चेत

Yashwant Varma : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची दिल्ली उच्च न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली.

Waqf bill
वक्फ विधेयकाला पहिले कायदेशीर आव्हान, काँग्रेस खासदाराची सर्वोच्च न्यायालयात धाव; याचिकेत नेमकं काय म्हटलंय?

राज्यसभेतही सत्ताधारी एनडीए आघाडीकडे काठावर बहुमत असल्याने हे विधेयक मंजूर करून घेताना केंद्र सरकारची कसोटी लागली होती. अखेर, लोकसभा आणि…

senior citizens evict their children or relatives from their property
वयोवृद्ध पालक मुलांना संपत्तीतून बेदखल करू शकतात? सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

Parents and Senior Citizens Act 2007 ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७ अंतर्गत मुलाला घरातून बाहेर काढण्यासाठी दाखल केलेला…

ताज्या बातम्या