सर्वोच्च न्यायालय Photos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
Arvind Kejriwal Bail, SC grants Arvind Kejriwal’s bail
12 Photos
Arvind Kejriwal Bail Conditions: न्यायालयाच्या ‘या’ महत्वपूर्ण चार अटींवर अरविंद केजरीवालांना जामीन मंजूर, वाचा काय आहेत अटी?

Arvind Kejriwal Bail, SC grants Arvind Kejriwal’s bail : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, जामीन…

Supreme Court on NCP Shivsena Rebel MLA Disqualification Marathi News
19 Photos
“…तर आम्हाला आदेश द्यावा लागेल”, सर्वोच्च न्यायालयाचा विधानसभा अध्यक्षांना अल्टिमेटम; वाचा नेमकं काय घडलं न्यायालयात?

SC Hearing on NCP Shivsena Rebel MLA Disqualification: सर्वोच्च न्यायालयात अध्यक्षांसमोरील आमदार अपात्रता प्रकरण सुनावणीतील दिरंगाईबाबतच्या याचिकांवर सुनावणी पार पडली.…

SUpreme Court CJI
11 Photos
सिब्बल यांचा युक्तीवाद अन् सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं; सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं?

निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी…

Uddhav thackeray eknath shinde supreme court (1)
12 Photos
“सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोगाविरुद्ध निर्णय देऊ शकतं”, शिवसेना सत्तासंघर्षावर वकिलाचं मोठं भाष्य

सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलानं शिवसेना सत्तासंघर्षावर मोठं भाष्य केलं आहे.

Uddhav Thackeray Supreme Court Uddhav Thackeray Eknath Shinde
21 Photos
सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालय निकाल, एकनाथ शिंदे ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले? वाचा…

राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ते नेमकं काय…

Neeraj Kaul Eknath Shinde 2
15 Photos
शिंदे गटाच्या वकिलांकडून ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांना जोरदार प्रत्युत्तर, नेमकं काय म्हणाले? वाचा महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष प्रकरणाच्या सुनावणीत ठाकरे गटाच्या तिन्ही वकिलांनी आपला युक्तिवाद संपला. यानंतर ठाकरे गटाचे वकील नीरज कौल यांनी नेमका काय…

Kapil Sibbal Uddhav Thackeray Eknath Shinde Supreme Court
30 Photos
Photos : युक्तिवादाच्या शेवटी ठाकरे गटाचे वकील भावनिक, सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल काय म्हणाले? वाचा…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला.…

kapil sibal
30 Photos
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरलं, वाचा युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. त्याचा हा आढावा…

supreme court hearing on shivsena dispute,
9 Photos
PHOTOS : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी; जाणून घ्या ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे

आज पहिल्या दिवशी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

demonetisation supreme court verdict (1)
15 Photos
नोटबंदीचा निर्णय योग्य! सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल, न्यायमूर्तींनी काय निरीक्षण नोंदवलं?

नोटबंदीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

ebc reservation
11 Photos
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता देशभरात आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण, नेमका निकाल काय?

देशातील आर्थिक दुर्बबल घटकांना उच्च शिक्षणात तसेच नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण मिळणार आहे.