सर्वोच्च न्यायालय Videos

‘लोकसत्ता’च्या या सदरामध्ये तुम्हाला भारतीय सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित सर्व बातम्या वाचता येतील. भारताचे सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ही भारताची सर्वोच्च आणि स्वायत्त न्यायिक संस्था आहे. भारतीय राज्यघटनेने एकत्रित न्यायप्रणालीचा स्वीकार केला आहे. प्रामुख्याने विविध राज्यांतील उच्च न्यायालये आणि इतर न्यायालये, तसेच न्यायाधिकरणांच्या निकालांविरुद्ध भारतातील सर्वोच्च घटनात्मक न्यायालयात अपील करता येते. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे हे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे काम आहे. तसेच विविध सरकारी प्राधिकरणे, केंद्र सरकार विरुद्ध विविध राज्यांची सरकारे किंवा एका राज्याच्या सरकार विरुद्ध देशातील अन्य राज्यांची सरकारे यांच्यातील वाद मिटवणे हेदेखील भारतीय सर्वोच्च न्यायालयाचेच काम आहे.


भारताच्या राष्ट्रपतींद्वारे राज्यघटनेच्या अंतर्गत विशेषतः संदर्भित केलेल्या प्रकरणांची सुनावणी एक सल्लागार म्हणून हे न्यायालय पार पाडते. सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारतातील सर्व न्यायालयांसाठी आणि केंद्र व राज्य सरकारांना पालन करणे बंधनकारक असते. घटनेच्या कलम १४२ नुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करणे हे भारताच्या राष्ट्रपतींचे कर्तव्य आहे आणि न्यायाच्या हितासाठी आवश्यक वाटणारे कोणतेही आदेश पारित करण्याचे मूळ अधिकार या न्यायालयाला दिलेले आहेत. २८ जानेवारी १९५० पासून आधीच्या प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायिक समितीची जागा सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद १२४ हे सर्वोच्च न्यायालयाची रचना व स्थापनेशी संबंधित आहे. अनुच्छेद १२४ नुसार मुख्य न्यायमूर्ती आणि अन्य न्यायाधीश मिळून भारताचे एक सर्वोच्च न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या सहीनिशी आणि मुद्रांकित अधिपत्राद्वारे करण्यात येते. त्यासाठी आवश्यकता वाटल्यास राष्ट्रपतींना ज्यांच्यासोबत विचारविनिमय करणे आवश्यक वाटेल, अशा न्यायाधीशांशी ते विचारविनिमय करू शकतात. सद्य:स्थितीत सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व ३३ इतर न्यायाधीश अशी एकूण ३४ सदस्यसंख्या आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवीत ३१ वरून ३४ केली.


महत्त्वाचे म्हणजे अगदी सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशांची संख्या केवळ आठ एवढी निश्चित करण्यात आली होती. मात्र, गरजेनुसार संसदेद्वारे ही संख्या वाढवण्यात आली. भारतीय न्यायालयांतील महत्त्वाची प्रकरणे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यांबाबत सर्व अपडेट्स तुम्हाला येथे वाचायला मिळतील.


Read More
CJI Chandrachud Said the difference between the powers of the court and the government
CJI Chandrachud: सरन्यायाधीशांनी सांगितलला न्यायालय व सरकारच्या अधिकारांमधील फरक

भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सोमवारी (४ नोव्हेंबर) एक्सप्रेस अड्डा’ या इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींच्या गणेशोत्सवातील…

Shivsena MP Sanjay Raut reaction on the new statue of Lady Justice
Sanjay Raut: “आता उघड्या डोळ्यांनी…”; न्यायदेवतेच्या नव्या मूर्तीबद्दल काय म्हणाले राऊत?

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांसाठीच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेचा पुतळा बदलण्यात आला आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी हटवण्यात आली आहे. तसेच तिच्या एका हातात तराजू…

CBI will submit a report about the Kolkata rape and murder case in court hearing LIVE
Supreme Court On Kolkata Case Live: सीबीआय न्यायालयात अहवाल करणार सादर, सुनावणी Live

Supreme Court On Kolkata Case: कोलकातामधील ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार…

Supreme Court On Kolkata Rape Murder Case CBI will submit report to court hearing
Supreme Court On Kolkata Case Live: सीबीआय न्यायालयात अहवाल करणार सादर, सुनावणी Live

Supreme Court On Kolkata Case: कोलकातामधील ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार…

SC Hearing on Kolkata Doctor Case Live
SC Hearing on Kolkata Doctor Case Live: सीबीआय न्यायालयात अहवाल करणार सादर, सुनावणी Live

कोलकातामधील ३१ वर्षीय महिला डाॅक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज सीबीआय आणि पश्चिम…

Supriya Sule gave this promise to Uddhav Thackeray over party symbol
सर्वोच्च न्यायालयात पक्ष चिन्हाची लढाई; सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला शब्द | Supriya Sule

सर्वोच्च न्यायालयातील पक्ष चिन्हाची लढाई; सुप्रिया सुळेंनी उद्धव ठाकरेंना दिला ‘हा’ शब्द | Supriya Sule

Why Scholar Ravichandran Bathran Is Cleaning Septic Tanks Check Out Supreme Courts Verdict On SC ST Caste Categorisation
डॉक्टर का करत आहेत शौचालयाची स्वच्छता? सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच १ ऑगस्ट रोजी अनुसूचित जाती आणि जमातीच्या उप-वर्गीकरणाशी संबंधित एक महत्त्वाचा निवाडा दिला. या निकालाच्या तळटीपेतील एका…

Amit Shah informed about the changes that will be made due to the New Criminal Laws
Amit Shah on New Criminal Laws: नव्या कायद्यांमुळे कोणते बदल होणार? अमित शहांनी दिली माहिती

देशात तीन नवे गुन्हेगारी कायदे आज सोमवारपासून (१ जुलै) लागू होत आहेत. भारतीय न्याय संहिता (BNS), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता…

Uddhav Thackeray: "आम्हाला न्याय द्या", ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी | Abhishek Ghosalkar
Uddhav Thackeray: “आम्हाला न्याय द्या”, ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी | Abhishek Ghosalkar

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (८ फेब्रुवारी) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आज उद्धव ठाकरे…

SC Verdict on Article 370
SC Verdict on Article 370: कलम ३७० बाबत न्यायालयाचा मोठा निर्णय, मोदींनी दिली प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयात कलम ३७० रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं. या याचिकांवर सुनावणी पार पडल्यानंतर आज (११…

baba ramdev reactions on Supreme Court Asks Patanjali To Stop Misleading Advertisements Will Impose Fine Of One Crore
Ramdev Baba: “आम्ही फाशीच्या शिक्षेलाही तयार, पण…” रामदेव बाबांनी दिली प्रतिक्रिया

दिशाभूल करणारे फसवे दावे बंद न केल्यास अशा प्रत्येक उत्पादनामागे एक कोटी रुपयांचा दंड ठोठावू, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने पतंजली…

ताज्या बातम्या