सुप्रिया सुळे News
सुप्रिया सुळे एक भारतीय राजकारणी आहेत, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्यांची पकड सैल झालेली नाही अशा शरद पवारांच्या त्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचा जन्म सोमवारी, ३० जून १९६९ पुणे येथे झाला. त्यांनी पुण्याचे सेंट कोलंबस स्कूल येथून शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात जय हिंद महाविद्यालयातून मुंबई, महाराष्ट्र बी.एस.सी. पूर्ण केली. पुढे त्यांनी वॉटर पोल्युशन या विषयात कॅलिफोर्निया, बर्कले विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या मुंबईला परतण्यापूर्वी इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये राहिल्या. सुप्रिया सुळे यांचे वडील शरद पवारसाहेब हे दिग्गज राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक आहेत.
त्यांच्या आईचे नाव प्रतिभा पवार आहे. त्यांचा चुलत भाऊ, अजित पवार हे एक प्रख्यात भारतीय राजकारणीही आहेत. त्यांनी सुदानंद सुळे यांच्याशी लग्न केले आहे. त्यांना रेवती सुळे आणि विजय सुळे अशी दोन मुले आहेत.
Read More