सुरेश वाडकर Videos

सुरेश ईश्वर वाडकर हे भारतातील प्रसिद्ध गायक आहेत. त्यांचा जन्म ऑगस्ट ७ १९५५ रोजी कोल्हापूर येथे झाला. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली. इ.स. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्यासंगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्‍यामधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव, रविन्द्र जैन, पंडित हृदयनाथ मंगेशकर इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. त्यानंतर जयदेवांनी संगीत दिलेल्या गमन (१९७८) या हिंदी चित्रपटातील ‘सीने में जलन’ हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले. आतापर्यंत त्यांनी प्रामुख्याने मराठी, आणि हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. २०११ साली ‘मी सिंधुताई सपकाळ’ या मराठी चित्रपटातील ‘हे भास्करा क्षितिजावर’ या या गाण्यासाठी उत्कृष्ट पार्श्वगायनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कर मिळाला. तर 2020 साली त्यांना भारत सरकारने पुरस्कार पुरस्काराने गौरविले.Read More

ताज्या बातम्या