सुश्मिता सेन News
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९९६ मध्ये दस्तक या चित्रपटाद्वारे तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले. १९९४ मध्ये मिस युनिव्हर्स या सौंदर्यस्पर्धेत तिने ‘मिस युनिव्हर्स’ म्हणजेच विश्वसुंदरी हा किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. सुष्मिताने फक्त हिंदी नाही तर काही तामिळ आणि इंग्रजी भाषेतील चित्रपटातही काम केले. त्याबरोबर तिला अनेक फिल्मफेअर पुरस्कारही मिळाले.