स्वाभिमानी शेतकरी संघटना Videos
स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील संघटना आहे. ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी संघटना आहे. राजू शेट्टी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. ही संघटना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी तसेच इतर प्रश्नांसाठी लढा देते.
राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेशी जुळलेले होते, मात्र संघटनेशी काही मतभेदांमुळे त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत शेट्टी यांनी हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. यात त्यांनी खासदार निवेदिता माने यांचा परभाव केला होता. शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी झाले. त्यांनी २०१४ साली परत हातकणंगले मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली आणि त्यात कलाप्पा आवाडे यांचा पराभव करत पुन्हा लोकसभेत निवडून गेले. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला.
Read More