तापसी पन्नू Videos
तापसी पन्नू हीसुद्धा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तापसीने प्रामुख्याने तेलुगु, तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिला गमतीने ‘फ्लॉप नायकांची देवी’ असंसुद्धा म्हणतात कारण तिने अनेक दक्षिण-भारतीय फ्लॉप नायकांबरोबर बरेच चित्रपट केले आहेत. तापसी अशा अभिनेत्रींपैकी एक आजे जीचे २०११ या एकाच वर्षात तब्बल ७ चित्रपट प्रदर्शित झाले. पिंक’ या बॉलिवूड चित्रपटात मीनल अरोरा ही भूमिका साकारल्यानंतर तापसी प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तापसीने २००४ मध्ये चॅनल V च्या टॅलेंट शो गेट गॉर्जियसमध्ये भाग घेऊन तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अनेक प्रिंट आणि टेलिव्हिजन जाहिरातींमध्ये दिसली. २०१० मध्ये तापसीने मॉडेलिंग सोडून अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. “झुम्मंडी नादम” या तेलगू चित्रपटातून तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले. तापसीने २०१३ मध्ये ‘चश्मे बद्दूर’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘बेबी’, ‘पिंक’, ‘रनिंग शादी’, ‘दिल जुंगली’ आणि ‘जुडवा २’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले.Read More