तलाठी Photos

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्हाला तलाठी (Talathi) संबधीत बातम्या वाचायला मिळतात. गावातील जमिनींचा पिकांचा हिशेब ठेवणारा हिशेबनीस म्हणजे तलाठी. महसूल अधिनियमाच्या १९६६च्या कायदान्वे सध्याची तलाठी व्यवस्था काम करचेय तलाठ्यांच्या कार्यक्षेत्रास साझा किंवा सज्जा असे म्हटले जाते. गावातील जमिनीच्या प्रत्येक इंच जागेची नोंदणी ठेवणे जलस्त्रोतांच्या नोंदी ठेवणे हे तलाठी पदाचे मुख्य काम आहे. त्यामुळे हे पद महत्त्वाचे आहे.


महसुली यंत्रणेत सध्या २१ प्रकारचे नमुने त्यासाठी आहेत. त्यातील ७ क्रमांकाचा नमुना जमिनीचा अधिकार दाखविणारा आणि १२ क्रमांकाचा नमुना पिकांची नोंद सांगणारा. या दोन्ही नमुन्यांच्या तपशिलांचा मिळून तयार होतो ‘सातबारा’. त्याच्या नोंदी घेणारी व्यक्ती म्हणजे तलाठी. खरे तर घेतलेल्या नोंदी मंजूर करण्याचे अधिकार तलाठ्यांकडे नाही, तर ते मंडळ अधिकाऱ्यांकडे असतात. पण लोकांचा संपर्क आणि गावातील अनेक प्रकारची कामे करणारा असल्याने तोच सारे काही करतो, असा समज सर्वसामान्यांमध्ये आहे.


महाराष्ट्र तलाठी भरती २०२३ मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १९ ते ३८ वर्षे दरम्यान असावे आणि त्यांच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र तलाठी अधिसूचना २०२३ नुसार, निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी यांचा समावेश आहे. तलाठी भरतीसंबधीत बातम्या तुम्ही येथे वाचू शकता.


Read More

ताज्या बातम्या