भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.
यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.
टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.