टीम इंडिया Videos

भारताच्या क्रिकेट संघाला टीम इंडिया (Team India) असे म्हटले जाते. भारतामध्ये क्रिकेट हा ब्रिटीशांमुळे पोहोचला. पुढे भारतीयांनी क्रिकेटला आपलेसे केले. स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी भारतामध्ये क्रिकेटसह अन्य खेळ देखील खेळले जात होते. पण कालांतरांने भारतामध्ये क्रिकेट पसरायला लागला. सुरुवातीच्या काळात ब्रिटीशांसह राजघराण्यातील मंडळी क्रिकेट खेळत असत. पुढे काही वर्षांनी क्रिकेट आणि फुटबॉलला चालना मिळावी या उद्देशाने कोलकातामध्ये क्रिकेट आणि फुटबॉल क्लबची स्थापना करण्यात आली. याच सुमारास ब्रिटीश साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेल्या इंडियाने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. पुढे स्वतंत्र भारताचा वेगळा क्रिकेटचा संघ तयार करण्यात आला.


यामध्येही अनेक राजघराण्यातील सदस्य होते. पुढे कालांतरीने भारताच्या संघामध्ये सर्वसामान्यांचाही समावेश करायला सुरुवात झाली. यातूनच पुढे भारत कसोटी आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपला खेळ दाखवू लागला.


टीम इंडियामध्ये पूर्वीपासून अनेक दिग्गज होते. ज्यामध्ये मंसूर अली खान पतौडी, विजय मर्चंट, विनू मांकड, फारुख इंजिनियर, कर्नल सी.के. नायडू, कपिल देव, बिशन सिंग बेदी, लाला अमरनाथ, रॉजर बिन्नी सुनील गावस्कर, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, झहीर खान, हरभजन सिंग, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा असंख्य क्रिकेटपटूंचा समावेश होतो. लोकसत्ता डॉट कॉमच्या या पेजवर टीम इंडियाशी संबंधित जुन्या आणि फारश्या माहीत नसलेल्या गोष्टी सांगितल्या जातील. तसेच टीम इंडियाच्या वर्तमानाची आणि भविष्यातील युवा क्रिकेटपटूंबाबतचे सर्व अपडेट्स दिले जातील.


Read More
Cricketer Jasprit Bumrah appeared in the special program Express Adda of The Indian Express
Jasprit Bumrah: “t20 वर्ल्ड कपमधील आवडता क्षण कोणता?”; जसप्रीत बुमराह म्हणतो… प्रीमियम स्टोरी

क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहनं द इंडियन एक्सप्रेसच्या एक्सप्रेस अड्डा या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात जसप्रीतला विविध प्रश्न विचारण्यात…

The Chief Minister felicitated the players of the Indian team at Varsha Bungalow
Team India Meets CM Shinde: भारतीय संघातील खेळाडू वर्षा निवासस्थानी, मुख्यमंत्र्यांनी केला सत्कार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्याची भेट घेतली.…

In Mumbai crowd of cricket lovers in Marine Drive area fans are eager to welcome the players
मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी, खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहते आतुर

मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी, खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहते आतुर

World champion Indian team meets Prime Minister Narendra Modi Live India T20 World Cup
Team India Meets PM Modi Live: विश्वविजेता भारतीय संघ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला Live

भारतीय टी-२० विश्वचषक विजेता संघ आज भारतात परतला आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव…

Crowd of fans to welcome Team India cheered by displaying posters at Churchgate station
टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी, चर्चगेट स्थानकावर पोस्टर झळकावत केला जल्लोष | Mumbai

टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांची गर्दी, चर्चगेट स्थानकावर पोस्टर झळकावत केला जल्लोष | Mumbai

World Cup Winner Team India Victory Parade In Mumbai Wankhede Stadium Live
Team India Victory Parade Live: टीम इंडिया मुंबईत दाखल, विजयी परेड Live

विश्वविजेता भारतीय संघ मुंबईत दाखल झाला आहे. मरीन ड्राईव्ह परिसरातून भारतीय संघाची विजयी परेड निघणार असून चाहत्यांनी तुफान गर्दी केली…

Indian cricket players were given a warm welcome in Delhi
Team Indian in Delhi: सूर्यकुमारने केला भांगडा, भारतीय खेळाडूंचं दिल्लीत जंगी स्वागत

भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. २९ जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव…

ताज्या बातम्या