तेजश्री प्रधान

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More
Tejashri Pradhan has kept the Mangalsutra from Honar Soon Me Hya Gharchi serial
तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र ठेवलंय जपून, कारण सांगत म्हणाली, “माझ्या आयुष्यातली…” फ्रीमियम स्टोरी

अभिनेत्री तेजश्री प्रधानने ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील मंगळसूत्र स्वतःकडे का ठेवलं? जाणून घ्या…

Tejashri Pradhan Green Floral Print Dress
10 Photos
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा हिरव्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील स्टायलिश लूक

नेटकऱ्यांनी तेजश्रीच्या फोटोशूटवर ‘खूप छान’, ‘गोड हास्य’, ‘सुंदर’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

Premachi Goshta Fame Tejashri Pradhan taken ukhana for sagar
Video: “पाण्यात ताज ताज म्हावरं…”, ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४’ सोहळ्यात तेजश्री प्रधानने घेतला भन्नाट उखाणा, व्हिडीओ आला समोर

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या भन्नाट उखाण्याचा पाहा व्हिडीओ

premachi goshta serial new mahaepisode mukta keep action against sawani
सावनीचा डाव मुक्ता उधळून लावणार? ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये नेमकं काय घडणार? वाचा…

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या महाएपिसोडमध्ये सावनीच्या डावपेचांना मुक्ता देणार सडेतोड उत्तर

Tejashri Pradhan share angry post on ambarnath molested 9 years old girl case
“अजून किती वेळानंतर या नराधमांना शिक्षा मिळणार…”, अंबरनाथमधील विनयभंग प्रकरणावर संतापली तेजश्री प्रधान, म्हणाली…

अंबरनाथ प्रकरणावर अभिनेत्री तेजश्री प्रधान नेमकं काय म्हणाली? जाणून घ्या…

tejashri pradhan and apurva nemlekar dubai trip
सवत माझी लाडाची! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम मुक्ता अन् सावनीची परदेशवारी; दोघींचे दुबईतील फोटो पाहिलेत का?

Premachi Goshta : ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ता अन् सावनीची दुबईवारी, फोटो आले समोर

Tejashri Pradhan Premachi Goshta Upcoming Episode Mukta completed her challenge and kiss to sagar
Video: मुक्ता चॅलेंज करणार पूर्ण, सगळ्यांसमोर करणार सागरला किस, पाहा रोमँटिक सीन

Premachi Goshta: मुक्ता सागरला किस करताना पाहून इंद्रा, स्वाती, कोमलची ‘ही’ रिअ‍ॅक्शन

Vignesh Kamble is now in charge of directing of tejashri pradhan serial Premachi goshta
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा आता ‘यांच्या’ हाती, आधी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचे पती होते दिग्दर्शक

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये झाला मोठा बदल

संबंधित बातम्या