तेजश्री प्रधान Photos

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More
Tejashri Pradhan Green Floral Print Dress
10 Photos
Photos: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘मुक्ता’चा हिरव्या फ्लोरल प्रिंट ड्रेसमधील स्टायलिश लूक

नेटकऱ्यांनी तेजश्रीच्या फोटोशूटवर ‘खूप छान’, ‘गोड हास्य’, ‘सुंदर’ अशा कमेंट्स केल्या आहेत.

Tejashree Pradhan shared brown dress look on instagram photos went viral
9 Photos
‘प्रेमाची गोष्ट’ फेम तेजश्री प्रधानचा स्टायलिश लूक चर्चेत; अभिनेत्रीच्या मनमोहक अदांवर चाहते झाले फिदा

तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे.

Tejashrii
9 Photos
सोज्वळ, खंबीर भूमिका करणाऱ्या तेजश्री प्रधानचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? खुलासा करत मराठमोळी गायिका म्हणाली…

खऱ्या आयुष्यात तेजश्रीचा स्वभाव कसा आहे हे एका लोकप्रिय गायिकेने आता सांगितले आहे.

ताज्या बातम्या