तेलंगणा निवडणूक २०२३ Videos

३० नोव्हेंबर रोजी तेलंगणामध्ये ११९ मतदार संघांसाठी मतदान (Telangana Election 2023) होणार आहे. यातील १९ जागा या अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी आणि १२ जागा अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २०२३ च्या शेवटी मतदान झाल्यानंतर मतमोजणी पूर्ण होऊन निकाल ३ डिसेंबर २०२३ रोजी जाहीर केला जाईल. सध्या तेलंगणामध्ये मतदान करण्याची पात्रता असलेले ३ कोटी नागरिक आहेत. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचा कार्यकाळ ६ जानेवारी २०२४ रोजी पूर्ण होत आहे. तेव्हा या राज्यामध्ये विधानसभेच्या ११९ जागांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने घेतला आहे.


२०१८ मध्ये तेलंगणा विधानसभेच्या (Telangana Assembly Election 2023) एकूण ११९ जागांपैकी ८८ जागांवर भारत राष्ट्र समितीने, १९ जागांवर कॉंग्रेसने विजय मिळवला होता. याउलट सर्व मतदार संघात आपले उमेदवार उभे करुनही तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाचा फक्त एक उमेदवार निवडून आला. कर्नाटक विजयानंतर तेलंगणावर छाप पाडण्याच्या प्रयत्नामध्ये कॉंग्रेस आहे. तर बीआरएस सत्ता टिकवून ठेवू पाहत आहे. यामध्ये भाजपा आपला जुना पराभव विसरुन या राज्यामध्ये विजय मिळवण्याची तयारी करत आहे.


Read More
why no congress in north and no bjp in south explained by girish kuber
उत्तरेत काँग्रेस नाही, दक्षिणेत भाजपा नाही..पाहा गिरीश कुबेर यांचं विश्लेषण!

राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगणा या चार राज्यांच्या मतमोजणीनंतर समोर आलेल्या निकालांवरून आता भविष्याबाबत अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत.…

Why Telangana was important for BJP Explained by Girish Kuber
भाजपासाठी तेलंगणा का महत्त्वाचं होतं? सांगतायत गिरीश कुबेर

उत्तरेकडच्या तीन राज्यांमध्ये भाजपाला मोठा विजय मिळाला असला, तरी तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसनं केसीआर यांच्या बीआरएसला पराभूत केलं आहे. या तिनही…

Why was Congress defeated in three states explained by Girish Kuber
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निवडणूक निकालांचं विश्लेषण गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशात चार राज्यांची मतमोजणी पार पडल्यानंतर त्यातील तेलंगणा वगळता इतर तिनही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. यात काँग्रेसचा पराभव…

Rahul Gandhi on Telangana Election Rally
Rahul Gandhi on Telangana Election Rally:राहुल गांधींचा तेलंगणातील किस्सा अन् प्रेक्षकांनाही हसू आलं

तेलंगणा विधानसभेसाठी काल ( ३० नोव्हेंबर ) मतदान पार पडलं. त्याठिकाणी भारत राष्ट्र समिती ( बीआरएस ) आणि काँग्रेसमध्ये थेट…

south actors standing in the queue to cast vote in telangana assembly election
Telangana Assembly Election च्या पार्श्वभूमीवर अल्लू अर्जुनसह अनेक कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क!

तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक दिवसांच्या प्रचारानंतर आता तेलंगणामध्ये नागरिक त्यांचा मतदानाचा हक्क बजावताना दिसत…