कसोटी क्रिकेट News

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
IND vs NZ Sanjay Manjrekar's tweet on Virat Kohli
IND vs NZ : संजय मांजरेकरांनी कोहलीबद्दल केलेल्या ट्वीटमुळे पेटला नवा वाद, विराट-रोहितच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर जुंपली

IND v NZ 2nd Test Match Updates : भारताच्या पहिल्या डावात कर्णधार रोहित शर्मा खाते न उघडता बाद झाला. यानंतर…

Washington Sundar twice clean bowled Rachin Ravindra in IND vs NZ 2nd test
Washington Sundar : वॉशिग्टनची ‘अति’सुंदर गोलंदाजी, सलग दुसऱ्या डावात रचिन रवींद्रचा उडवला त्रिफळा, पाहा VIDEO

Washington Sundar IND vs NZ : पुण्यातील दुसऱ्या कसोटीतील सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने सलग दुसऱ्यांदा रचिन रवींद्रचा त्रिफळा…

Yashasvi Jaiswal made history as the 1st Indian batter to score 1,000 Test runs in a calendar year before turning 23
Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालने गाठला नवा पल्ला! कसोटी क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय

Yashasvi Jaiswal Record : न्यूझीलडंविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात यशस्वीने जैस्वालने ३० धावांची खेळी साकारत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. यानंतर…

Virat Kohli Trolled after 15th Clean Bowled in his Test career
Virat Kohli : ‘विराट कोहलीने आता इंग्लंडकडून खेळावे…’ फुलटॉसवर त्रिफळाचीत झाल्याने चाहत्यांचा संताप, मीम्स व्हायरल

Virat Kohli Troll : विराट कोहलीचा फ्लॉप दुसऱ्या कसोटी सामन्यातही कायम आहे. ज्यामुळे चाहते त्याच्या संतापले आहेत.

Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल

Virat Kohli IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पुणे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली सुरुवातीला लयीत दिसला. पण…

Washington Sundar credit given Ashwin in IND vs NZ Pune Test Performance
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने कोणाच्या मदतीने घेतल्या सात विकेट्स? कर्णधार किंवा प्रशिक्षकला नव्हे, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय

Washington Sundar Reaction : वॉशिंग्टन सुंदरने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात शानदार गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने ५९ धावांत सात विकेट्स घेण्याचा पराक्रम…

IND vs NZ India vs New Zealand Pune Test Match Updates in Marathi
IND vs NZ : रविचंद्रन अश्विनने शेन वॉर्नला मागे टाकत केला मोठा पराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला तिसरा गोलंदाज

IND vs NZ Ravichandran Ashwin : स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पुणे कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मोठा मोठा पराक्रम केला आहे.…

IND vs NZ Washington Sundar clean bowled Rachin Ravindra and Tom Blundell video viral
IND vs NZ : वॉशिंग्टनची ‘सुंदर’ गोलंदाजी! कर्दनकाळ रचिन रवींद्र पाठोपाठ टॉम ब्लंडेलचाही उडवला त्रिफळा, पाहा VIDEO

IND vs NZ Washington Sundar : पुण्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने सलग दोन षटकात दोन विकेट्स…

people who came to watch the India-New Zealand Test match in Pune clamor for water pune news
पुण्यातील भारत-न्यूझीलंड कसोटी सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांची पाण्यासाठी वणवण…

भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला उत्साहाने सुरुवात झाली. प्रेक्षकांनीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी केली…

IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल

IND vs NZ Pune Test Sarfraz Khan : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना पुण्यात खेळला…

ताज्या बातम्या