कसोटी क्रिकेट Photos

कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या सदस्य देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा प्रथम श्रेणी क्रिकेटचा एक प्रकार आहे. यामध्ये एका सामन्यात प्रत्येक संघाला दोन असे चार डाव असतात. कसोटी सामना हा पाच दिवसांपर्यंत चालतो. पूर्वी कसोटी सामन्यांना वेळेचे मर्यादा नव्हती. मुळात क्रिकेटचा उदय झाल्यानंतर १८६१-६२ मध्ये टेस्ट मॅच किंवा कसोटी सामना हा शब्द वापरायला सुरुवात झाली. पण या शब्दाचा आणि कसोटी सामन्याचा तसे पाहता फारसा संबंध नव्हता. १८७७ पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांना कसोटी सामन्यांचा दर्जा देण्यात आला.


असा पहिला आंतरराष्ट्रीय दर्जा असलेला सामना हा १५ मार्च १८७७ रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंट (एमसीजी) येथे खेळण्यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (ब्रिटिश व्यावसायिकांचा संघ) यांच्यात खेळला गेला. पुढे १८९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांना प्रथम कसोटी सामने असे म्हटले गेले. पुढे कसोटी क्रिकेट हा शब्द प्रचलित झाला. सध्या जगभरातील १२ देश आयसीसीचे पूर्ण सदस्य असून कसोटी क्रिकेट खेळत आहेत. १९३२ मध्ये भारताने कसोटी सामने खेळायला सुरुवात केली. आधी हे सामने फक्त दिवसा खेळले जात असत. २०१२ मध्ये आयसीसीने डे-नाइट कसोटी सामन्यांना परवानगी दिला. त्यानंतर ३ वर्षांनी नोव्हेंबर २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अ‍ॅडलेड ओव्हल येथे पहिला डे-नाइट कसोटी सामना खेळला गेला. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाप्रमाणे कसोटी क्रिकेटची सुद्धा लीग असावी असा प्रस्ताव २००९ पासून आयसीसीकडे केला जात होता.


एकूण दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर २०१९ मध्ये कसोटी क्रिकेटच्या लीग स्पर्धेचे म्हणजेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले. २०१९-२१ या वर्षातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे विजेते न्यूझीलंडचा कसोटी संघ ठरला. तसेच २०२१-२३ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपवर ऑस्ट्रेलियाने नाव कोरले. दोन्ही वर्षांमध्ये उपविजेतेपद हे भारताकडे होते.


Read More
IND vs AUS India Team meet Australia PM Anthony Albanese photos viral
9 Photos
IND vs AUS : टीम इंडियाने सराव सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी साधला संवाद, पाहा फोटो

Team India with Australia PM : भारतीय संघ अॅडलेड कसोटीपूर्वी प्राईम मिनिस्टर इलेव्हनविरूद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळणार…

Border Gavaskar Trophy Most Sixes
7 Photos
PHOTOS : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-७ खेळाडू, रोहित-विराट कितव्या क्रमांकावर आहेत? जाणून घ्या

Border Gavaskar Trophy : भारतीय संघ 22 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) खेळणार आहे. तत्पूर्वी या…

Indian captains to lose most home Test matches
9 Photos
सौरव गांगुली ते महेंद्रसिंग धोनीपर्यंत ‘या’ दिग्गजांच्या नेतृत्वात भारताला मायभूमीवर सर्वाधिक पराभवांचा सामना करावा लागला

नुकताच भारताला न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत घरच्याच पीचवर मात खावी लागली आहे. दरम्यान भारताच्या कोणत्या टेस्ट क्रिकेट कर्णधारांना मायदेशातील कसोटी…

oldest players in tests wilfred rhodes wg grace miran bakhsh jack hobbs
कोणी ४७व्या वर्षी केले पदार्पण तर कोणी ५२व्या वर्षी खेळली अखेरची कसोटी, ‘हे’ आहेत सर्वात वयस्कर क्रिकेटपटू

Oldest Test players : क्रिकेटपटूंच्या वयाकडे खूप लक्ष दिले जाते. वयाची तिसावी पार करताच त्यांचे दिवस मोजायला लागतात. त्याबरोबर निवृत्तीबद्दल…

Rohit Sharma Virat Kohli MS Dhoni most test win at home by an Indian captain
5 Photos
मायदेशात सर्वाधिक कसोटी जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये रोहित पाचव्या स्थानी, तर पहिल्या क्रमांकावर कोण?

Team India Test Captains : भारतात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत रोहित शर्मा पाचव्या क्रमांकावर आहे, तर विराट कोहली…

Rishabh Pant becomes first to break Mohammad Rizwan and Liton Das record for most centuries by a wicketkeeper at WTC
5 Photos
ऋषभने मोहम्मद रिझवान आणि लिटन दासला मागे टाकत केला मोठा पराक्रम, WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून ऋषभ पंत WTC मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला.

ravichandran-ashwin-century-in-test-match-indvsban-know-his-special-lovestory
11 Photos
Photos: पती अष्टपैलू खेळाडू तर पत्नी अभियंता, वाचा भारतीय संघाच्या शतकवीर खेळाडूची अनोखी प्रेम कहाणी

IND VS BAN: भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यामध्ये अश्विनच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाची विजय आणखी भक्कम झाली आहे.

IND vs BAN Test Series Updates in marathi
7 Photos
IND vs BAN Test : विराट ‘किंग’ तर रोहित ‘फ्लॉप’, जाणून घ्या भारतीय खेळाडूंची बांगलादेशविरुद्धची कामगिरी

India vs Bangladesh Test : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे. यशस्वी जैस्वाल,…

Top 5 batsmen to hit most sixes in WTC
9 Photos
PHOTOS : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज

Most Sixes in WTC : डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूच्या टॉप-५ तीन भारतीय आणि दोन इंग्लंडच्या खेळाडूंचा समावेश आहे. या…

Ravindra Jadeja was awarded the man of the match award for his outstanding performance in the third Test match against England.
7 Photos
PHOTOS : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर रवींद्र जडेजाने पत्नीला दिले खास ‘गिफ्ट’

Ravindra Jadeja Man of The Match : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने राजकोट कसोटीत चमकदार कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर…

Yashasvi Jaiswal retired hurt after a century
7 Photos
PHOTOS : जैस्वालने पुन्हा एकदा शतक झळकावून जिंकली चाहत्यांची मनं, मागील कसोटीत झळकावले होते द्विशतक

Yashasvi Jaiswal Century : इंग्लंडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटीत यशस्वी जैस्वालने शानदार खेळी खेळली आणि शतक झळकावले. यापूर्वी त्याने…

India won by 106 Run against England IND vs ENG 2nd Test
7 Photos
PHOTOS : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ची काढली हवा, चौथ्या दिवशीच गुंडाळला इंग्लिश संघाचा डाव

India vs England 2nd Test : टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा बॅझबॉल फ्लॉप ठरला. भारताने इंग्लंडचा १०६ धावांनी पराभव करत मालिकेत…

ताज्या बातम्या