ठाणे न्यूज News

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
robbery in municipal school materials worth thousands of rupees including computers stolen
महापालिका शाळेतच चोरी, संगणकांसह हजारो रुपयांचे साहित्य चोरीला

भिवंडी महापालिकेच्या शाळा क्रमांक २७ मधून सात संगणक, प्रिंटर, पेटीमध्ये ठेवलेले शैक्षणिक साहित्य चोरीला गेल्याचे समोर आले आहे.

Constable arrested for bribery of Rs 20 thousand
२० हजार रुपयांच्या लाचेप्रकरणी हवालदार ताब्यात

पोलीस ठाण्यात आलेले प्रकरण मिटविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस हवालदार गणेश राठोड याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात…

accident of BEST bus due to hits divider in Thane
ठाण्यात बेस्ट बसची दुभाजकाला धडक लागून अपघात

कोपरी येथे पूर्व द्रुतगती महामार्गावरील सेवा रस्त्यावरून येणाऱ्या एका बेस्ट बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून अपघात झाल्याची…

Jeans washing factories, highway, agriculture,
ठाणे : महामार्गालगतही जीन्स धुलाई कारखाने, स्थानिकांची शेती धोक्यात, प्राणी पक्षांनाही पिण्यायोग्य पाणी मिळेना

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांमध्ये बेकायदा जीन्स धुलाई कारखान्यांचे मोठे जाळे पसरल्याची बाब लोकसत्ताने विविध वृत्तांमधून समोर आणली आहे.

Thane , Disha project , academic quality,
‘दिशा’मुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या मार्फत काही महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आलेल्या…

Heritage tree scam, Thane, construction projects,
ठाण्यात हेरिटेज वृक्ष घोटाळा, वृक्षांचे वयोमान कमी दाखवून बांधकाम प्रकल्पांची वाट मोकळी

काही ठराविक बिल्डराच्या प्रकल्पांची वाट मोकळी करून देण्यासाठी वारसा (हेरीटेज) वृक्षांचे वयोमान कमी दाखविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Digi Thane, Thane, Thane latest news,
बंदावस्थेत असलेला ‘डिजी ठाणे’ प्रकल्प लवकरच नव्या रुपात

इस्रायलमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने सुरू केलेला ‘डिजी ठाणे’ प्रकल्पावर तीन वर्षात ३१ कोटी रुपये खर्च केले.

Thane Municipal Corporation, washing vehicles,
ठाण्यात सर्व्हिस सेंटरमध्ये वाहने धुण्यास बंदी, ठाणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी निर्णय

सध्या तीव्र उन्हाळा असल्याने धरणातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून यामुळे ठाणे महापालिकेने पाणी बचतीसाठी पाऊले उचलली आहेत.

Thane-Borivali subway, Meeting , Thane, subway,
ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाबाबत बैठक ठरली.. पण, नागरिक नाराज

ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाविरोधात आंदोलन करणारे स्थानिक रहिवाशांसोबत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अखेर बैठक आयोजित केली असून ही बैठक येत्या…

Drug smuggling by criminal of mcoca in Irani settlement in Kalyan
कल्याणमध्ये इराणी वस्तीमधील मोक्कातील गुन्हेगाराकडून अंमली पदार्थांची तस्करी

कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्तीमधील एका गुन्हेगाराला मेफोड्रोन या अंमली पदार्थांची तस्करी करताना आंबिवली अटाळी भागातील बंदरपाडा भागातून अटक केली.

Vishal Gawlis family moves court in Kalyan over suspicious death
संशयास्पद मृत्युप्रकरणी कल्याणमधील विशाल गवळीच्या कुटुंबीयांची न्यायालयात धाव?

बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आठ गुन्हे दाखल विशाल गवळी याने गेल्या आठवड्यात तळोजा कारागृहातील स्वच्छतागृहात टॉवेलने…

ताज्या बातम्या