ठाणे न्यूज Videos
लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.
ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.
ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.
Read More