ठाणे News

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
MNS warns of agitation after borivade ground in Ghodbunder was grabbed by contractor
घोडबंदर येथील बोरिवडे मैदान ठेकेदाराकडून गिळंकृत, मनसेचा तीव्र आंदोलनाचा इशारा

घोडबंदर येथील बोरिवडे मैदानात एका ठेकेदाराने जलवाहिन्यांची साठवणुक करण्याबरोबरच तिथे शेड उभारून हे मैदान गिंळकृत केल्याचा आरोप करत खेळाच्या मैदानातील…

Eknath Shinde, Eknath Shinde Health, Eknath Shinde news, CM Eknath Shinde,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत सुधारणा, वैद्यकीय तपासणीनंतर मुख्यमंत्री मुंबईतील वर्षा निवासस्थानी रवाना

गेल्या तीन ते चार दिवसांपासून प्रकृती ठिक नसल्यामुळे ठाण्यातील शुभदीप निवासस्थानी विश्रांती घेत असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी…

Commercial buildings demolished during cement concrete road widening at Garibacha Pada in Dombivli
डोंबिवलीत गरीबाचा पाडा येथे सिमेंट काँक्रीट रस्ता रूंदीकरणातील व्यापारी गाळे जमीनदोस्त

महात्मा फुले रस्त्यावरील गरीबाचापाडा येथील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोलनगरी प्रस्तावित सिमेंट काँक्रीटच्या १५ मीटर रस्त्याला बाधित होणारे २५ व्यापारी…

TMT department announced strict action against passengers traveling without tickets
टीएमटीची विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, गेल्या अकरा महिन्यात ६ हजाराहून अधिक प्रवाशांवर कारवाई

टीएमटी विभागाने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.

15 child marriages successfully prevented in Thane district in past year girls education stopped
शाळा सुटली, पालकांनी लग्नगाठ बांधली ठाणे जिल्ह्यात १५ बालविवाह रोखण्यात यश, शिक्षण, गरिबी प्रमुख कारण

ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात १५ बालविवाह रोखण्यात यश आले आहे. यातील जवळपास सर्वच मुलींचे शिक्षण थांबले होते.