ठाणे Videos

ठाणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. कोकण विभागामध्ये या जिल्ह्याचा समावेश होतो. ठाणे महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या उत्तरेला वसलेले आहे. ठाणे शहरामध्ये ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. याच्याजवळच मुंबई महानगर प्रदेश (MMR)चा भाग देखील आहे.

ठाण्याचा उल्लेख तिसऱ्या शतकात मौर्य साम्राज्यामध्ये आढळतो. सातवाहन, चालुक्य, पोर्तुगीज यांच्यासह विविध राजवटींनी ठाण्यावर राज्य केले. आज ठाणे हे सुमारे १.८ दशलक्ष लोकांनी गजबजलेले शहर आहे.<br />
नौकाविहार आणि सहलीसाठी प्रसिद्ध असलेले उपवन तलाव हे ठाण्यातील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय केळवा चौपाटी, येऊर हिल्स अशा ठिकाणीही लोक फिरायला जातात. सर्फिंग, वॉटर स्पॉर्ट्ससाठी केळवा चौपाटी प्रसिद्ध आहे. तर येऊर ही जागा तिच्या नैसर्गिक सौदर्यासाठी लोकप्रिय आहे.

हिंदू संस्कृती आणि मराठी सण हे ठाण्याची ओळख आहेत. येथे गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी आणि होळी असे सण जल्लोषात साजरे केले जातात.

ठाण्यामध्ये रस्ते, रेल्वे यांसह हवाई मार्गांचे जाळे आहे. यांच्यामार्फत हे शहर महाराष्ट्रातील अन्य शहरांशी जोडले गेले आहे. भारतातील प्रमुख ठिकाणांना जोडणारी उत्तम विकसित पायाभूत सुविधा ठाण्यामध्ये आहेत. ठाण्यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या ठाणे कॅम्पससह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. याशिवाय मोठमोठी अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असलेली रुग्णालयेही या शहरामध्ये आहेत. ठाणे हे आरोग्य सेवा केंद्रांचे घर बनले आहे.

सांस्कृतिक वारसा लाभलेला ठाणे हा जिल्हा नैसर्गिकरित्या समृद्ध आहे. विविध सुविधा आणि सेवा असलेले ठाणे शहर तेथील रहिवाश्यांसाठी अनुकूल आहे. पर्यटकांसाठीही ही जागा आकर्षणाचे केंद्र बनली आहे.

ठाणे कशासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: उपवन किल्ला, घोडबंदर किल्ला यांसारखे ऐतिहासिक किल्ले; उपवन तलाव, ठाणे खाडी, मासुंदा तलाव (तलाव पाली) अशा ठिकाणांसाठी ठाणे प्रसिद्ध आहे.

ठाण्यातील हवामान कसे आहे?
उन्हाळ्यात ठाण्यातील हवामान हे उष्ण-दमट स्वरुपाचे असते. तर हिवाळा हा सौम्य असून तेथे उष्णकटिबंधीय हवामान असते. जून ते सप्टेंबर हा काळ पावसाळा असतो. या चार महिन्यात शहरामध्ये मुसळधार पाऊस पडतो.

मी ठाण्यात कसे पोहोचू शकतो?
उत्तर: ठाणे हे रेल्वे, महामार्ग आणि हवाईमार्गांनी भारताच्या विविध ठिकाणांशी जोडलेले आहे. ठाण्यापासून २५ किमी अंतरावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ठाण्यामध्ये रेल्वे स्टेशन देखील आहे. रेल्वेद्वारे ठाणे हे मुंबई व महाराष्ट्रातील अन्य भागांशी जोडले गेले आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांशी ठाणे शहर रस्त्यांद्वारे जोडले गेले असल्याने महामार्गाचा वापर करुन ठाण्याला जाता येते.

ठाण्यातील काही लोकप्रिय पर्यटन आकर्षणे कोणती आहेत?
उपवन तलाव, घोडबंदर किल्ला, मासुंदा तलाव (तलाव पाळी), केळवा चौपाटी, टिकुजीनी-वाडी, ओवळेकर वाडी, फुलपाखरु उद्यान आणि बावखळेश्वर मंदिर असे काही पर्यटन स्थळे ठाण्यामध्ये आहेत.

ठाण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?
ठाण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. या चार महिन्यांमध्ये ठाण्यात हिवाळा असतो. आल्हाददायक हवामान असल्याने ही वेळ फिरण्यासाठी अनुकूल असते. जर तुम्हाला पाऊस आवडत असेल, तर तुम्ही जून ते सप्टेंबर या महिन्यांत ठाण्याला जाऊन पाऊस आणि हिरव्या निसर्गाचा आनंद घेऊ शकता.

Read More
Avinash Jadhav slapped the rickshaw driver who beat up a woman
Avinash Jadhav: रिक्षा चालक महिलेला मारहाण करणाऱ्याला अविनाश जाधव यांनी लगावली कानशिलात

Thane: ठाण्यातील विविआना मॉलमधील सुरक्षा रक्षकाने एका महिला रिक्षा चालकाला मारहाण केली. या घटनेनंतर अविनाश जाधव आणि मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा…

mns leader avinash jadhav taking resignation back aftre raj thackeray order
Avinash Jadhav MNS: मनसेमधील नाराजीनाट्य संपलं? सकाळी राजीनामा दुपारी माघार, अविनाश जाधव म्हणाले..

Avinash Jadhav Resignation MNS Raj Thackeray Call: ठाणे पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाचा राजीनामा दिला होता.…

Eknath Shinde on Backfoot in Maharashtra Chief Minister Race Son MP shrikant Shinde pens Emotional Post For Father
Eknath Shinde Son Emotional: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाबाबत भूमिका सांगताच श्रीकांत शिंदे भावुक

Shrikant Shinde Emotional Post For Eknath Shinde : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ तारखेला त्यांच्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे…

Eknath Shinde Shivsena Totally Defeats Uddhav Thackeray Aaditya Thackeray How Did Thane Rallies Went Against MVA
एकनाथ शिंदेच ‘ठाणेदार’, उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या सभा, प्रचार व दावे का ठरले फोल?

Thane Shivsena Uddhav Thackeray Defeat: शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील आमदारांचा ‘गद्दार’ असा उल्लेख करत…

MNS Thane Impact fade over as Raju Patil and Avinash Jadhav Lost in maharashtra Vidhansabha Election 2024 Even After Raj Thackeray Rallies Got Huge Crowd
MNS in Thane: ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे, अविनाश जाधव, राजू पाटील असताना मनसेची गणितं कशी चुकली? प्रीमियम स्टोरी

Maharashtra Assembly Election MNS Result Updates : ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या एकूण १८ पैकी १२ जागांवर निवडणूक लढलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला…

What is the exit poll prediction in Thane and Palghar Maharashtra Vidhansabha election 2024 Exit Polls Update
Exit Polls Update : ठाणे, पालघरमध्ये मतदारांचा कल कोणाच्या बाजूने असेल? काय आहे एक्झिट पोलचा अंदाज? प्रीमियम स्टोरी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चालू असलेला रणसंग्राम सध्या शेवटाकडे आला आहे. आज राज्यभर मतदान पार…

Actors to disabled voters cast their votes in Kopri Pachpakhadi for vidhansabha election 2024
Kopari Pachpakhadi Voting: कोपरी पाचपाखाडीत अभिनेते ते दिव्यांग मतदारांनी उत्साहात बजावलं कर्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीत आज मतदानाच्या दिवशी मतदार उत्साहात पोहोचले होते. यावेळी मतदारांनी लोकसत्ताशी संवाद…

Thane Kopari pachpakhadi Constituency CM Eknath Shinde vs Kedar Dighe Tough Fight Citizens Raise Multiple Questions Slums Rickshaw
CM Shinde Constituency Public Opinion: कोपरी- पाचपाखाडीत शिंदेंच्या कामाला लोकांनी किती मार्क दिले? प्रीमियम स्टोरी

Kopari Pachpakhadi Public Opinion: ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढत पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र…

mahayuti melava at thane cm eknath shinde live
Eknath Shinde Live: ठाण्यात महायुतीचा मेळावा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Live

ठाण्यात महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण करत आहेत. या भाषणातून एकनाथ शिंदे…

ताज्या बातम्या