तृणमूल काँग्रेस

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) हा एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. सध्या या पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सरकार आहे. या पक्षाने २०११ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली होती. तृणमूल पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेत तीन वेळा बहुमत मिळवले आहे आणि २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष आहे.


सुरुवातीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होत वाजपेयी सरकराचा भाग झाला होता. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने ७ जागांवर विजय मिळवला होता. तर १९९९ च्या निवडणुकीत पक्षाने भाजपसह ८ जागांवर विजय मिळवला होता. २००० मध्ये पक्षाने कोलकाता महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत तृणमूल ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तृणमूल पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली होती.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी ३४ जागांवर विजय मिळवला होता. तसेच पक्षाला पाच वेगवेगळ्या राज्यांमधून ६ टक्के मते मिळाली होती, त्यामुळे हा पक्ष राष्ट्रीय दर्जासाठी देखील पात्र ठरला होता. २ सप्टेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोगाने तृणमूल पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाची यशाची घोडदौड कायम राहिली. पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु त्यास भाजपकडून फटकाही बसला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ममता बॅनर्जींचा पक्ष निवडून आला आणि तिसऱ्यांदा राज्यात या पक्षाची सरकार स्थापन झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २९ जागांवर विजय मिळवला होता.


Read More
Mamata Banerjees
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेप; ममता बॅनर्जी म्हणाल्या, “मी समाधानी नाही”

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला मिळालेल्या शिक्षेवर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mamata Banerjee Abhishek Banerjee cold war
TMC : तृणमूल काँग्रेस पक्षात राजकीय भूकंप होणार? ममता बॅनर्जी आणि अभिषेक यांच्यातील ‘कोल्ड वॉर’ चर्चेत

तृणमूल काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत धुसफूस वाढली आहे.

Jyotiraditya Scindia lady killer said Kalyan Banerjee
“सिंधिया लेडी किलर”, तृणमूलचे खासदार असं का म्हणाले? केंद्रीय मंत्र्याचंही जशास तसं प्रत्युत्तर

Jyotiraditya Scindia in Parliament : तृणमूलच्या खासदाराची सभागृहात ज्योतिरादित्य सिंधियांवर वैयक्तिक पातळीवर टीका.

INDIA Bloc to move impeachment motion against HC judge who participated in VHP event.
Impeachment : उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात इंडिया आघाडीचा महाभियोग प्रस्ताव, ३६ खासदारांनी केल्या स्वाक्षऱ्या; नेमकं काय आहे प्रकरण?

Allahbad High Court Judge: कपिल सिब्बल यांनी घेतलेल्या पुढाकरानंतर महाभियोग प्रस्तावर विरोधी पक्षांच्या ३६ खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे.

TMC MLA Said We Will Build Babri Mosque Again
Humayun Kabir : “पश्चिम बंगालमध्ये नवी बाबरी मशीद बांधणार आणि…”; तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची घोषणा

पश्चिम बंगालचे तृणमूलचे आमदार हूमायूँ कबीर यांनी बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची घोषणा केली आहे.

Gautam Adani
Parliament Winter Session : अदाणींच्या मुद्द्यावर विरोधकांमध्ये मतभेद, काँग्रेसशी तृणमूलची फारकत; अधिवेशनातील धोरणावर वेगळी भूमिका!

अदणींवर झालेल्या आरोपांवर चर्चा घेण्याच्या काँग्रेसच्या मागणीपासून टीएमसीने फारकत घेतली आहे.

Kalyan Banerjee Property
9 Photos
JPC मधून निलंबित करण्यात आलेले कल्याण बॅनर्जी कोण आहेत?, कोलकाता ते दिल्लीपर्यंत आहे कोट्यवधींची मालमत्ता!

Kalyan Banerjee Property : वक्फ विधेयकासंदर्भात संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत झालेल्या भांडणानंतर टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांना निलंबित करण्यात…

Kolkata Doctor Case March to Nabanna by Chhatra Samaj
Kolkata Doctor Case : काय आहे पश्चिमबंग छात्र समाज? नबन्नावरील मोर्चाआड विद्यार्थी संघटनेकडून कोलकात्यात हिंसाचार?

Kolkata Doctor Case March to Nabanna : पश्चिमबंग छात्र समाजने काढलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतलं आहे.

Badlapur Sexual Assault : “कोलकाता प्रकरणात काही तासांत अटक, तर बदलापूरमध्ये अनेक दिवस…”, महुआ मोइत्रांकडून महायुती सरकार लक्ष्य

Badlapur Sexual Assault Mahua Moitra : बदलापूर घटनेप्रकरणावरून महुआ मोइत्रांची महाराष्ट्र सरकारवर टीका.

tmc mp arup chakraborty on kolkata doctor rape and murder case
Kolkata Doctor Rape and Murder: “आंदोलनाच्या नावाखाली तुम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसोबत…”, TMC खासदाराचं डॉक्टरांबाबत धक्कादायक विधान!

खासदार अरूप चक्रवर्ती म्हणाले, “डॉक्टर संपावर आहेत. पण संपाच्या नावावर जर ते बाहेर असतील आणि रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळाले नाहीत,…

संबंधित बातम्या