तृणमूल काँग्रेस Videos

अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (TMC) हा एक राजकीय पक्ष आहे. या पक्षाचा प्रभाव मुख्यत्वे पश्चिम बंगाल या राज्यात आहे. ममता बॅनर्जी यांनी १ जानेवारी १९९८ मध्ये या पक्षाची स्थापना केली होती. सध्या या पक्षाची पश्चिम बंगालमध्ये सरकार आहे. या पक्षाने २०११ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्या आघाडीची ३४ वर्षांपासूनची सत्ता संपुष्टात आणली होती. तृणमूल पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेत तीन वेळा बहुमत मिळवले आहे आणि २० मे २०११ पासून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी पक्ष आहे.


सुरुवातीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (एनडीए) सहभागी होत वाजपेयी सरकराचा भाग झाला होता. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने ७ जागांवर विजय मिळवला होता. तर १९९९ च्या निवडणुकीत पक्षाने भाजपसह ८ जागांवर विजय मिळवला होता. २००० मध्ये पक्षाने कोलकाता महापालिका निवडणुकीत विजय मिळवला होता. २००१ मध्ये काँग्रेस पक्षाशी युती करत तृणमूल ६० जागांवर विजय मिळवत प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि २००६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तृणमूल पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडी सोडली होती.


२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल पक्षाने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी ३४ जागांवर विजय मिळवला होता. तसेच पक्षाला पाच वेगवेगळ्या राज्यांमधून ६ टक्के मते मिळाली होती, त्यामुळे हा पक्ष राष्ट्रीय दर्जासाठी देखील पात्र ठरला होता. २ सप्टेंबर २०१६ रोजी निवडणूक आयोगाने तृणमूल पक्षाला राष्ट्रीय राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली. २०१६ च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पक्षाची यशाची घोडदौड कायम राहिली. पक्षाने बहुमत मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा जिंकल्या, परंतु त्यास भाजपकडून फटकाही बसला होता. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा ममता बॅनर्जींचा पक्ष निवडून आला आणि तिसऱ्यांदा राज्यात या पक्षाची सरकार स्थापन झाली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने २९ जागांवर विजय मिळवला होता.


Read More
MP Derek O'brien Suspended From Rajya Sabha
MP Derek O’brien Suspended From Rajya Sabha: तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांचं राज्यसभेतून निलंबन!

बुधवारी (१३ डिसेंबर) दोन तरुणांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात शिरून सुरक्षाभंग केला होता. या प्रकरणानंतर देशभर खळबळ उडाली. यावरून आता विरोधक…

ताज्या बातम्या