टॉलिवूड Photos
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. या प्रदेशामध्ये अस्तित्त्वामध्ये असलेल्या फिल्म इंडस्ट्रीला टॉलिवूड (Tollywood) असे म्हटले जाते. १९२१ मध्ये टॉलिवूडमधील ‘भीष्म प्रतिज्ञा’ पहिला चित्रपट (मूकपट) रघुपती वैकंय्या नायडू यांनी तयार केला. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील योगदानाबद्दल त्यांना टॉलिवूडचे जनक असे म्हटले जाते. १९३२ मध्ये ‘भक्त प्रल्हाद’ हा पहिला तेलुगू भाषिक बोलपट प्रदर्शित करण्यात आला. काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजनवर दाक्षिणात्य चित्रपटांचे डब व्हर्जन प्रसारित करण्याचा ट्रेंड सुरु झाला. त्यानंतर ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर टॉलिवूड हे नाव प्रत्येक भारतीयाच्या लक्षात राहिले. तेलुगू सिनेसृष्टीने आत्तापर्यंत असंख्य दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे. सध्या डब होणारे सर्वाधिक चित्रपट हे टॉलिवूडचे असतात.
मेगास्टार चिरंजीवी, प्रभास, रामचरण, अल्लू अर्जुन, महेश बाबू, एनटीआर, नागार्जुना, विजय देवरकोंडा हे साउथ सुपरस्टार्स टॉलिवूडचे प्रातिनिधित्त्व करतात. या इंडस्ट्रीमध्ये अनेक नामवंत दिग्दर्शक, लेखक, अभिनेते-अभिनेत्री, निर्माते होऊन गेले आहेत. ‘बाहुबली’, ‘मख्खी’, ‘आरआरआर’ असे तगडे चित्रपट बनवणारे एस.एस.राजामौली देखील टॉलिवूडचे आहेत. Read More