
ट्रेंडिंग (Trending) हे ‘लोकसत्ता डॉट कॉम’वरील एक लोकप्रिय सदर आहे. या सदरामध्ये तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या म्हणजेच चर्चेतील विषयांबाबत माहिती दिली जाते. सोशल मीडियाच्या काळात इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यूट्युब अशा माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी क्षुल्लक विषयांपासून महत्त्वाच्या विषयांवर सोशल मीडियावर चर्चा होत असते. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण सोशल मीडियावर सक्रिय असतात. रोज सोशल मीडियावर नवनवीन विषय चर्चेत येत असतात. त्यालाच ट्रेंडिंग विषय म्हणतात. अशा ट्रेंडिंग विषयांबाबत जाणून घ्यायला अनेकांना आवडते.
तुम्ही सोशल मीडियावरील महत्त्वाच्या घडमोडींबाबत येथे जाणून घेऊ शकता. ट्रेंडिंग या पेजवरही तुम्हाल विविध सोशल मीडिया माध्यमांवर ट्रेंड होत असलेल्या विषयांबाबत माहिती मिळू शकते. कधी महत्त्वाच्या विषयांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात; तर कधी महत्त्वाच्या विषयांबाबत सोशल मीडियावर नेटकऱ्यांची चर्चा सुरू असते. सोशल मीडियावर ट्रेंड होणारे हे विषय आपल्या रोजच्या जीवनातील असतात. कित्येकदा काही विषय अत्यंत मजेशीर असतात; तर काही विषय धक्कादायक असू शकतात. तुम्हाला जर रोजच्या ट्रेंडिग विषयांबाबत जाणून घ्यायचे असेल, तर अशा वेळी तुम्ही ‘लोकसत्ता डॉट कॉम’च्या या पेजवर भेट देऊन रोजचे अपडेट्स मिळवू शकता. सोशल मीडियासह इतर महत्त्वाच्या घटनांबाबतच्या बातम्या जाणून घेऊ शकता.
तसेच त्यामध्ये सोशल ट्रेंड्स, मनोरंजनात्मक व्हिडीओ, व्हायरल व्हिडीओ यांचादेखील समावेश पाहायला मिळेल. ट्रेंडिंग न्यूजमध्ये राजकारणापासून मनोरंजन क्षेत्रापर्यंत सर्व घडमोडी एका क्लिकवर तुम्हाला जाणून घेता येतील.