गुगल अल्गोरिदम्समुळे व्हायरल झालेले ट्रेंडिंग व्हिडीओ (Trending Video)आपल्या प्रोफाईलवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी जिओ कंपनीने भारतीयांसाठी नवे प्लॅन्स आणले होते. यामुळे इंटरनेट जगतामध्ये मोठी क्रांती आली. प्रत्येकाला कमी पैश्यांमध्ये इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे सोशल मीडियावर वापरण्याचे प्रमाण वाढले.
करोना काळामध्ये घरी बसून काहीच करता येत नसल्यामुळे लोकांनी स्वत:चे व्हिडीओ बनवून पोस्ट करायला सुरुवात केली. तेव्हापासून दर दिवशी व्हायरल होणाऱ्या ट्रेंडिंग व्हिडीओंचे प्रमाण वाढत गेले. सध्या ट्रेंडिंग व्हिडीओंमार्फत लोक प्रसिद्धी देखील मिळवतात. सोशल माध्यमांच्या विश्वामध्ये टेंडिंगमध्ये असणं आवश्यक आहे. Read More