त्रिपुरा हे भारताच्या ईशान्येकडील एक वैभवशाली राज्य आहे. आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे. या राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेथे २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पार्टीने ३६ जागा मिळवल्या होत्या. पुढे त्रिपुरामध्ये भाजपाने सरकार स्थापन केले होते. बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मे २०२२ मध्ये काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. पुढे माणिक साहा हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.
त्रिपुरातील बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ २२ मार्च २०२३ रोजी पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाद्वारे तेथे फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणुकांचे आयोजन (Tripura Assembly Election 2023) करण्यात आले. त्रिपुरा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, टिप्रा मोथा पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष असे तीन प्रमुख पक्ष आहेत. ६० विधानसभा सदस्यांची निवड करण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान झाले. २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी पूर्ण करुन निकाल घोषित झाले. भाजपाला आपल्या जोडीदार पक्षांसह सत्ता राखण्यात यश मिळाले. Read More
देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…
मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत.