त्रिपुरा विधानसभा निवडणूक २०२३ News

त्रिपुरा हे भारताच्या ईशान्येकडील एक वैभवशाली राज्य आहे. आगरताळा ही त्रिपुराची राजधानी आहे. या राज्यामध्ये सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. तेथे २०१८ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पार्टीने ३६ जागा मिळवल्या होत्या. पुढे त्रिपुरामध्ये भाजपाने सरकार स्थापन केले होते. बिप्लब कुमार देब यांनी त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मे २०२२ मध्ये काही कारणास्तव त्यांनी राजीनामा दिला. पुढे माणिक साहा हे मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.

त्रिपुरातील बाराव्या विधानसभेचा कार्यकाळ २२ मार्च २०२३ रोजी पूर्ण होणार आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाद्वारे तेथे फेब्रुवारी २०२३ मध्ये निवडणुकांचे आयोजन (Tripura Assembly Election 2023) करण्यात आले. त्रिपुरा राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, टिप्रा मोथा पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष असे तीन प्रमुख पक्ष आहेत. ६० विधानसभा सदस्यांची निवड करण्यासाठी १६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान झाले. २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी पूर्ण करुन निकाल घोषित झाले. भाजपाला आपल्या जोडीदार पक्षांसह सत्ता राखण्यात यश मिळाले.
Read More
MANIK SAHA
त्रिपुरात माणिक साहा यांना पुन्हा संधी! ८ मार्च रोजी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

भाजपाने त्रिपुरा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. ६० जागांवर झालेल्या या निवडणुकीत भाजपाने ३२ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला…

amit shah and narendra modi and j p nadda
भाजपाची तिन्ही राज्यांत चांगली कामगिरी, जनाधार मात्र घटला! नागालँड, त्रिपुरा, मेघालयच्या निकालाचा अर्थ काय?

ईशान्येकडील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

Tripura Assembly Election Congress CPIM alliance
Tripura Assembly Election 2023: त्रिपुरामध्ये काँग्रेस-डावी आघाडी अपयशी का ठरली?

Tripura Assembly Election 2023: काँग्रेस-डाव्या आघाडीला त्रिपुरामध्ये सत्ता मिळवण्याचा अंदाज होता, मात्र निकाल मात्र अगदी वेगळाच लागला.

girish kuber on election
Video: ईशान्य भारतात पुन्हा भाजपाची सत्ता, निवडणूक निकालाचा अन्वयार्थ काय? जाणून घ्या गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

देशाच्या राजकारणासाठी ईशान्य भारतातील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालाचा नेमका अर्थ काय आहे, यावर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी सविस्तर विश्लेषण…

tripura nagaland Meghalaya elections exit polls
Exit Polls: त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपा सत्ता राखेल; मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था

Tripura, Nagaland, Meghalaya Assembly Election Exit Polls : ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय राज्यातील निवडणुकांचे मतदानोत्तर चाचणीच्या (एक्झिट पोल)…

tripura election
मेघालय-त्रिपुरात त्रिशंकू, नागालँडमध्ये ‘एनडीए’, विधानसभा निवडणुकीतील मतदानोत्तर चाचणीचा अंदाज

मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडल्यानंतर या दोन राज्यांसह त्रिपुरातील मतदानोत्तर चाचणीचे (एक्झिट पोल) अंदाज हाती आले आहेत.