एक्स Videos
ट्विटर (Twitter) ही एक सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग साईट आहे. मोबाईलफोन्सचा वापर वाढल्याने हे अॅप जास्त लोकप्रिय झाले. हे अॅप कमीत कमी शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी वापरले जाते. व्यक्ती वा संस्थेनुसार त्या-त्या ट्विटर अकाऊंटमध्ये फरक असतो. ही सुविधा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागत नाही. यामध्ये पोस्ट केलेल्या मजकुराला ट्वीट असे म्हटले जाते. एका ट्वीटची मर्यादा २८०-४००० कॅरेक्टर्स इतकी आहे. यामध्ये फोटो, जीआयएफ अशा सुविधा देखील आहेत. ट्विटरने सर्वप्रथम अधिकृत अकाउंट्ससाठी ब्लू टिक ही सेवा सुरु केली. २००६ साली या कंपनीची सुरुवात झाली होती. सध्या कंपनीचा वर्षभराचा टर्नओव्हर अब्जावधींच्या घरात असतो. मागच्या वर्षी अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्कने या कंपनीचे शेअर्स विकत घेत ट्विटरची मालकी घेतली. तेव्हापासून ट्विटर आणि मस्क चर्चेत असतात.Read More